Breaking

Wednesday, February 19, 2025

भारत आता पाकिस्तानला करु शकतो चॅम्पियन्स ट्रॉफीबाहेर, काय आहे संपूर्ण समीकरण जाणून घ्या.. https://ift.tt/XqMrOzp

दुबई : पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असले तरी त्यांना या स्पर्धेबाहेर भारताचा संघ काढू शकतो, असे समीकरण आता समोर आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आता भारत कसा पाकिस्तानचे पॅकअप करू शकतो, असे समीकरण आता समोर आले आहे.

पाकिस्तानला बसला मोठा धक्का

पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने जोरदार धक्का दिला. न्यूझीलंडने ३२० धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करतान पाकिस्तानचा संघ हा २६० धावांतच ऑल आऊट झाला. त्यामुळे न्यूझीलंडला या सामन्यात ६० धावांनी विजय मिळवता आला. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात लाजीरवाऱ्या पराभवानंतर मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा रन रेट हा - १.२०० असा झाला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे काय आहे समीकरण...

चॅम्पियन्स ट्रॉफीत आठ देश आहेत. ज्यांचे दोन गट करण्यात आले आहेत. भारताच्या गटात पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे देश आहे. हे संघ प्रत्येक देशाबरोबर प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत, याचाच अर्थ प्रत्येक संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीत तीन सामने खेळावे लागणार आहेत.

भारतीय संघ पाकिस्तानचे कसे करू शकतो पॅकअप...

पाकिस्तानचा पहिल्या सामन्यातच मोठा पराभव झाला आहे, त्यांचा रनरेटही आता कमालीचा निगेटीव्ह आहे. त्यामुळे आता भारतीय संघ पाकिस्तानचे पॅकअप कसे करू शकतो, याचे समीकरण आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात भराताने पाकिस्तानचा पराभव केला, तर पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात येणार आहे. कारण भारताने पाकिस्तानवर विजय साकारला, तर हा त्यांचा दुसरा पराभव ठरणार आहे. या स्पर्धेत जो संघ दोन सामने जिंकेल तो थेटपणे उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानला पराभूत केले तर त्यांचे या स्पर्धेत पॅकअप होऊ शकते, असे समीकरण आता समोर येत आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर त्यांची गुणांची बोहनी होऊ शकते. त्यानंतर भारताने जर पाकिस्तानला पराभूत केले तर त्यांना उपांत्य फेरीचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानला पराभूत करत आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २३ फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात नेमकं काय होतं, याकडे आता तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MYAy4O5

No comments:

Post a Comment