Breaking

Saturday, March 8, 2025

उत्तर प्रदेशने २१ विमानतळांसह इतिहास रचला? जाणून घ्या फोटोमागचं सत्य https://ift.tt/4gr62Tf

नवी दिल्ली : विमानतळाचा एका फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारं विमानतळ अतिशय हायटेक असून तिथे अनेक विमानं उभी असल्याचं दिसतयं. युजर्सकडून हा फोटो शेअर करत हे उत्तर प्रदेशातील विमानतळ असल्याचा दावा केला करत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये असंही सांगितलं जातंय, की उत्तर प्रदेशात एकूण २१ विमानतळ आहेत. मात्र विश्वास न्यूजने आपल्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं सांगितलं आहे. व्हायरल फोटोतील विमानतळ उत्तर प्रदेशातील नाही, तर तुर्कीतील इस्तांबूल शहरातील आहे. इस्तांबूल विमानतळाचा फोटो उत्तर प्रदेशातील असल्याचा खोटा दावा करून फोटो व्हायरल केला जात आहे. तसंच व्हायरल फोटोमध्ये केलेला यूपीमध्ये २१ विमानतळ असणारा दावाही चुकीचा आहे. उत्तर प्रदेशात १९ विमानतळ असून त्यापैकी पाच सुरू नाहीत, तर एका विमानतळाचं बांधकाम सुरू आहे.फेसबुक मनोज उपाध्याय यांनी ४ मार्च २०२५ रोजी फोटो शेअर करत लिहिलेलं, की 'उत्तर प्रदेशने इतिहास रचला, २१ विमानतळं असणारा भारतातील पहिलं राज्य, ही प्रभू राम, काशी विश्वनाथ जी मुरलीवाले आणि गंगा माँ यांची पावन भूमी आहे...!!!” जय हो.'पोस्टची .

पडताळणीत काय समोर?

व्हायरल फोटोचं सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने सर्च केला. त्यावेळी व्हायरल फोटो सीएनट्रॅव्हलर नावाच्या एका वर आढळला. वेबसाइटवरील रिपोर्टनुसार, व्हायरल फोटो तुर्कीतील इस्तांबूल शहरातील विमानतळाचा आहे. या रिपोर्टमध्ये विमानतळाचं वैशिष्ट्यं, डिझाइन, सुविधा आणि टेक्नोलॉजीबाबत सांगण्यात आलं आहे. व्हायरल दाव्याबाबत गुगलवर संबंधित कीवर्ड्स सर्च केल्यानंतर एक रिपोर्ट आढळला. एयरपोर्ट इनफोकडून याबाबत ७ एप्रिल २०२० रोजी एक प्रकाशित करण्यात आला होता. या रिपोर्टमध्येही फोटो इस्तांबूल विमानतळावरील असल्याचं सांगण्यात आलं. पडताळणीवेळी विश्वास न्यूजला व्हायरल फोटो तुर्की एयरलाइन वर मिळाली. त्याशिवाय व्हायरल फोटोशी संबंधित एक व्हिडिओ इस्तांबूल एयरपोर्टच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर आढळला. ४ डिसेंबर २०२१ रोजी शेअर करण्यात आला होता. तसंच हिंदुस्तान वेबसाइटवर १२ मार्च २०२४ रोजी प्रकाशित एका नुसार, उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य आहे, जिथे सर्वाधिक विमानतळं आहेत. संसद डॉट इन वर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशात एकूण १९ विमानतळं आहेत, ज्यात पाच ही वाहतुकीसाठी नसून एका विमानतळाचं काम सुरू आहे. तसंच अधिक माहितीसाठी विश्वास न्यूजने दैनिक जागरणच्या लखनऊचे वरिष्ठ पत्रकार राजीव बाजपेयी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल फोटो उत्तर प्रदेशातील नसल्याचं सांगितलं.

निष्कर्ष

विश्वास न्यूजने केलेल्या तपासात असं आढळून आलं की, तुर्कीच्या इस्तांबूल शहराचे फोटो उत्तर प्रदेशच्या विमानतळाच्या नावाने व्हायरल केले जात आहेत. (This story was originally published by , and republished by MT as part of the Shakti Collective.)


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Td5GVZ0

No comments:

Post a Comment