Breaking

Sunday, March 9, 2025

मुलीला बॉयफ्रेण्डसोबत 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् डोकं फिरलं, ऑनर किलिंगची थरकाप उडवणारी केस https://ift.tt/5auMYqd

बागपत: आपल्या मुलीला एका तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर वडिलांचा पारा चढला आणि त्यानंतर जे घडलं त्याने साऱ्यांना हादरवून सोडलं आहे. या वडिलाने आपली मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेण्डची हत्या केली आहे. या भयानक हत्याकांडाच्या घटनेने उत्तर प्रदेशातील बागपत जिल्हा हादरुन गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाटी पाठवले. या घटनेतील आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बडौत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोनामना गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे जनता वैदिक पदवी महाविद्यालयात शिकणारा बीएससीचा विद्यार्थी जोनामना गावातील एका मुलीसोबत होता. यावेळी त्या मुलीच्या वडिलांनी या दोघांनाही घरी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. मुलीचे कुटुंबीय सकाळी शेतात गेले होते, याचा फायदा घेण्यासाठी तो मुलगा मुलीच्या घरी पोहोचला होता. मात्र, तेवढ्यात मुलीचे वडील पुष्पेंद्र यांना याबाबत कळालं.

दोरीने दोघांचा गळा आवळून हत्या

या घटनेची माहिती मिळताच पुष्पेंद्र हे ताबडतोब शेतातून घरी परतले. घरी मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेण्डला याबाबत काहीही माहिती नव्हतं. तेव्हा त्याला हे दोघेही आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. आपल्या लेकीला एका मुलासोबत अशा अवस्थेत पाहून पुष्पेंद्र संतापला आणि त्याच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरात पुष्पेंद्रने दोरीने गळा आवळून या दोघांचीही हत्या केल्याचा आरोप आहे. जेव्हा कुटुंबातील सदस्य घरी पोहोचले तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. बागपतचे एसपी अर्पित विजयवर्गीय मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहांचे शवविच्छेदन केले. या भयानक हत्याकांडानंतर गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस मुलगी आणि मुलाच्या कुटुंबियांची चौकशी करत आहेत. या भयानक हत्याकांडाच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कुटुंबातील इतर सदस्यांची आणि जवळच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली आहे. मुलीचे वडील पुष्पेंद्र यांच्यावर गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Hj5v8PW

No comments:

Post a Comment