Breaking

Monday, March 10, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर भारतीय संघाची विक्टरी परेड होणार की नाही, समोर आली मोठी अपडेट https://ift.tt/qdDtWxM

दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग दोन वर्षांत दोन आयसीसीची जेतेपदं जिंकली आहेत. भारताने जेव्हा टी २० वर्ल्ड कप जिंकला होता, त्यानंतर मुंबईत विक्टरी परेड काढण्यात आली होती. त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर भारतीय संघाची विक्टरी परेड कुठे होणार, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे.भारताने टी २० वर्ल्ड कप वेस्ट इंडिजमध्ये जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघ काही दिवस वादळात अडकला होता. पण त्यानंतर जेव्हा भारताचा संघ मायदेशात परतला तेव्हा त्यांना प्रथम नवी दिल्लीत उतरवण्यात आले होते. भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भारताचा संघ मुंबईत दाखल झाला आणि त्यानंतर त्यांची विक्टरी परेड काढण्यात आली होती. त्यावेळी चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडूंना वर्ल्ड कप ट्रॉफीसह लाइव्ह पाहिले होते. त्यानंतर भारतीय संघाचा अभूतपूर्व असा सत्कार वानखेडे स्टेडियमवर करण्यात आला होता. त्यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटूंसह प्रशासकही उपस्थित होते.भराताने त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे आता २०२५ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाची विक्टरी परेड नेमकी कधी आणि कुठे होणार, याची उत्सुकता सर्वच चाहत्यांना लागलेली आहे. पण यावेळी चाहत्यांचा हिरमोड होणार आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर भारतीय संघाची विक्टरी परेड होणार नसल्याचे आता समोर आले आहे. ही विक्टरी परेड का होणार नाही, याचे कारणही आता समोर आले आहे.भारताने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, त्यावेळी ९ मार्च ही तारीख होती. पण आता २२ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे . त्यामुळे आता खेळाडूंना आयपीएलता सराव करण्यासाठी फार कमी वेळ मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर भारतीय संघ विक्टरी परेड काढणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू दुबईतून आल्यावर आपल्या घरी जातील आणि त्यानंतर ते आयपीएलच्या सरावासाठी आपल्या संघाकडे जातील, असे आता समोर येत आहे. भारतीय संघाची विक्टरी परेड झाली असती तर चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला असता. पण यावेळी मात्र विक्टरी परेड होणार नसल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे चाहते या गोष्टीमुळे नाराज होऊ शकतात. पण येत्या काही दिवसांत हे लाडके खेळाडू त्यांना आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळू शकतात.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wmhYvVs

No comments:

Post a Comment