Breaking

Thursday, March 6, 2025

हे फक्त पाकिस्तानातच होऊ शकतं, खेळाडू झोपला आणि आऊट झाला, नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या.. https://ift.tt/r4IUAXu

संजय घारपुरे : पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकते. एक खेळाडू सामना सुरु असताना झोपला आणि चक्क आऊट झाल्याचे आता समोर आले आहे. पण या खेळाडूला बाद तरी कसे देण्यात आले, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता. पण या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे.सौद शकील हा पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज. त्याने चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकही केले होते. मात्र त्याच्यावर टाइम आऊट होण्याची वेळ आली. तो पाकिस्तानातील प्रेसिडेंट कप स्पर्धेतील अंतिम लढतीच्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये झोपल्याची चर्चा आहे. प्रेसिडेंट कप स्पर्धेतील अंतिम सामना चार दिवसांचा आहे. त्यातील पहिल्या डावात हे घडले. सौद स्टेंट बँक संघातून खेळतो. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येतो. त्यांची प्रथम फलंदाजी होती. इमरान बट आणि रमीझ अझिझने ८४ धावांची सलामी दिली होती. त्यानंतर इमरानला उमर अमीन चांगली साथ देत होता. पीटीव्हीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शरझाद याने लागोपाठच्या चेंडूंवर उमर अमीन आणि फवाद आलम यांना बाद केले. यानंतरचा चेंडू खेळण्यासाठी सौदने क्रीझवर लगेच येणे अपेक्षित होते. मात्र सौद दीर्घ प्रतिक्षेनंतर आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार नव्या फलंदाजाने त्याच्यापूर्वीचा फलंदाज बाद झाल्यानंतर तीन मिनिटांत स्ट्राईक घेणे अपेक्षित असते. सौदने फलंदाजीचा पवित्रा घेतला तोपर्यंत हा वेळ उलटून गेला होता. पीटीव्हाचा कर्णधार अहमद बट्ट याच्या हे लक्षात आले. त्याने टाइम आऊटसाठी दाद मागितली आणि पंचांनी त्याला बाद केले. सौद बाद झाल्यामुळे मर्यादित षटकांच्या लढतीत पाक संघातून खेळणार इरफान खान नियाझी मैदानात आला. तो पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला, त्यामुळे शरझादची हॅटट्रिकही पूर्ण झाली. या पडझडीमुळे स्टेट बँकेची अवस्था १ बाद १२८वरून ५ बाद १२८ अशी झाली.सौदची विकेटच चर्चेत नाही, तर या घटनेनंतर पाकने अंतिम लढतीसाठी निवडलेली वेळही धक्कादायक आहे. रमझान असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या सामन्यातील खेळ रोज संध्याकाळी ७.३० वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर प्रत्येक दिवसाच्या खेळाची सांगता पहाटे २.३० वाजता होईल असेही ठरले. त्यात सुरुवातीस टी आणि त्यानंतर डिनर विश्रांतीही दिली. शहझादच्या हॅटट्रीकमुळे पीटीव्हीने स्टेट बँकेला २०५ धावांत गुंडाळले. शहझादने त्यानंतर नाबाद १२५ धावा करीत पीटीव्हीला आघाडीही मिळवून दिली.

वर्ल्ड कपमध्येही

भारतात २०२३मध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेश - श्रीलंका सामन्याच्यावेळी अँगेलो मॅथ्यूज मैदानात आला होता. मात्र स्ट्राईक घेण्यापूर्वी हेल्मेटचा पट्टा घट्ट करायला गेला आणि तो तुटला. त्यामुळे त्याने नवे हेल्मेट मागवले. मात्र या घडामोडीत उशिर होत असल्याचे अपील बांगलादेशचा कर्णधार शकीलने केले. त्याने दोन मिनिटांत स्ट्राईक न घेतल्याबद्दल मॅथ्यूजला बाद देण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/v9O1p0h

No comments:

Post a Comment