गुवाहाटी : चेन्नईच्या संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. महेंद्रसिंग धोनी यावेळी योग्य स्थानावर फलंदाजीला आला खरा, पण त्यालाही चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. पण चेन्नईचा पराभव झाला असला तरी धोनीचा खास सत्कार यावेळी बीसीसीआयच्या सचिवांच्या हस्ते करण्यात आला आणि या सत्काराचे कारणही आता समोर आले आहे. धोनीने या सामन्यात ११ चेंडूंत १६ धावा केल्या खऱ्या, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. चेन्नईला यावेळी सहा धावांनी पराभव पत्करावा लागल्याचे समोर आले.महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलचा १८ वा हंगाम खेळत आहे. त्यामुळे आसाम क्रिकेट संघटनेने धोनीचा सत्कार यावेळी केल्याचे आता समोर आले आहे. धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही आणि आसाम किंवा गुवाहाटीचा संघ आयपीएलमध्ये नाही. त्यामुळे धोनी या मैदानात खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आसाम क्रिकेट संघटनेने या संधीचे सोने करण्याचे ठरवले. गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सने घरचे मैदान आहे, पण तरीही त्या मैदानात धोनीचा सत्कार करण्यात आला. कारण आसाममध्येही धोनीचे चाहते आहे. चाहत्यांना धोनीला पाहता आले. त्यामुळे आसाम क्रिकेट संघटनेने धोनीचा सत्कार करण्याचा निर्णय यावेळी घेतला. बीसीसीआयच्या सचिवांच्या हातून यावेळी धोनीचा सत्कार करण्यात आला.महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांत दमदार कामगिरी केली आहे. धोनीने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवची स्टम्पिंग केली होती आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर दुसऱ्य सामन्यात धोनीने आरसीबीच्या फिल सॉल्टची स्टम्पिंग केली, तोदेखील दमदार फलंदाजी करत होता. या तिसऱ्या सामन्यात नितीश राणा तुफानी फलंदाजी करत होता. राणालाही यावेळी धोनीनेच स्टमिंग केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या तिन्ही सामन्यात महेंद्रसिंग धोनीचे महत्वाचे योगदान असल्याचे पाहायला मिळाले आहे.धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने पाच आयपीएलची जेतेपदं जिंकली होती. पण धोनी आता चेन्नईचा कर्णधार नाही. पण धोनीच्या मार्गदर्शनाखाली ऋतुराज गायकवाड चांगले नेतृत्व करत असल्याचे समोर आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oMYzKBx
No comments:
Post a Comment