Breaking

Tuesday, March 4, 2025

मोहम्मद शमीच्या त्या एका चेंडूने सामना भारताच्या बाजूने फिरवला, सामन्याचा टर्निंग पॉइंट पाहा... https://ift.tt/nQkszJ2

दुबई : भारताने ऑस्ट्रेलियावर सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि फायनलमध्ये दमदार एंट्री केली. यावेळी विराट कोहलीने ८४ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण मोहम्मद शमीला या विजयानंतर विसरून चालणार नाही. कारण मोहम्मद शमीचा एकच चेंडू यावेळी भारतासाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मोहम्मद शमीने जेव्हा तो चेंडू टाकला होता. त्यावेळी रोहित शर्मानेही मोहम्मद शमीचे कौतुक केले होते.

मोहम्मद शमीने त्यापूर्वी दोन झेल सोडले होते...

मोहम्मद शमीने त्यापूर्वी दोन महत्वाचे झेल सोडले होते. त्यामुळे तो दडपणाखाली होता. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने ट्रेव्हिस हेडची कॅच सोडली होती, त्यावेळी तो शून्यावर होता. हेडने त्यानंतर ३९ धावांची खेळी साकारली. मोहम्मद शमीने त्यानंतर स्टीव्हन स्मिथचाही झेल सोडला होता. त्यामुळे त्याच्यावरचे दडपण जास्तच वाढले होते.

मोहम्मद शमीचा कोणता चेंडू ठरला टर्निंग पॉइंट..

ही गोष्ट घडली ती ३७ व्या षटकाच. त्यापूर्वी भारताला १० षटकांत एकही विकेट मिळाली नव्हती. त्यावेळी रोहित शर्माने मोहम्मद शमीवर विश्वास दर्शवला आणि मोहम्मद शमीच्या हातात चेंडू सुपूर्द केला. मोहम्मद शमीचा सामना यावेळी स्टीव्हन स्मिथ करत होता. स्मिथने अर्धशतक झळकावले होते आणि तो आता शतकाच्या दिशेने कूच करत होता. रोहित शर्माने सर्व गोलंदाज आणून पाहिले, पण एकालाही स्टीव्हन स्मिथला बाद करता येत नव्हते.मोहम्मद शमी ३७ वे षटक घेऊन आला होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शमीने अशी काही करामत केली की, स्टीव्हन स्मिथला मोहम्मद शमीने वेग बदलून टाकलेला चेंडू समजला नाही. शमीच्या गोलंदाजीवर तो पूर्णपणे चुकला आणि त्यामुळेच तो क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळाले. शमीचा हा चेंडू भारतासाठी टर्निंग पॉइंट ठरला. कारण जर स्मिथ बाद झाला नसता तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिनशे धावा करू शकला असता आणि भारताला विजय मिळवता आला नसता. कारण या खेळपट्टीवर २८५ ही सर्वाधिक धावसंख्या आहे, जिचा पाठलाग करता आला आहे. त्यामुळे शमीची विकेट ही टर्निंग पॉइंट ठरली. त्यामुळे रोहित शर्मा यावेळी शमीवर चांगलाच खूष झाला होता. शमीने या सामन्यात दोन कॅच सोडल्या असल्या तरी त्याने तीन महत्वाच्या विकेट्स मिळवल्या आणि भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/108AH6w

No comments:

Post a Comment