
दुबई : चॅम्पियॉन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान मोठ्या बढाया मारत होती. पण आता फायनलमध्ये पोहोचत भारताने पाकिस्तानची संपूर्ण जगासमोर लाज काढली आहे. त्यामुळे येत्या ५ दिवसांत पाकिस्तानवर आता मोठ्या नामुष्कीची वेळ येणार आहे.पाकिस्तानचा संघ तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. स्पर्धेतून बाहेर पडणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ ठरला होता. त्यानंतर आता भारताने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत केले आणि फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असला तरी त्यांनी पाकिस्तानची जगासमोर लाज काढल्याचे समोर आले आहे. पण भारताने हे नेमकं केलं तरी कसं, हे आता समोर आलं आहे.भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील साखळी फेरीत तिन्ही लढती जिंकल्या. त्यामुळे ते गटात अव्वल स्थानावर विराजमान झाले आणि त्यामुळे त्यांचा सेमी फायनलचा सामना हा ऑस्ट्रेलियाशी झाला. भारताने सेमी फायनलमध्ये आता ऑस्ट्रेलियालाही पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघाने आता फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा सेमी फायनलचा सामना होणार आहे. यामधून जो जिंकेल तो भारताशी फायनलमध्ये दोन हात करणार आहे. पण सर्वात महत्वाची म्हणजे ही फायनल आता पाकिस्तानात होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान ही चॅम्पिय़न्स ट्रॉफीची यजमान आहे. पण यजमान असूनही त्यांच्या देशात या स्पर्धेची फायनल होणार नाही, अशी वेळ आतापर्यंत कोणत्याही देशावर आली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानवर ही सर्वात मोठी नामुष्की आल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला फायनलची सर्व तयारी आपला देश सोडून दुबईत करावी लागणार आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून सर्वांना आता आपला देश सोडून दुबईत यावे लागणार आणि भारताचा खेळ पाहावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की होणार आहे, हे मात्र नक्की.भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये पराभूत केले, यापेक्षा भारताच्या काही चाहत्यांना जास्त आनंद आता चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल भारतामुळे पाकिस्तानात होऊ शकणार नाही, याचा झाला याहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/el6Kv92
No comments:
Post a Comment