
प्रसाद रानडे, रत्नागिरी: अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये लहान सहान गोष्टींवरुन टोकाचं पाऊल उचलण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी घटना कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे घडल्याची माहिती समोर आली आहे. चिपळूण येथे नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अल्पवयीन मुलीने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत सध्या काहीही माहिती नाही, तिने आपला जीव का दिला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
राहत्या घरात विद्यार्थिनीने गळफास घेत जीव दिला
रत्नागिरीतील चिपळूण शहरातील डीबीजे महाविद्यालयातून इयत्ता बारावीची परीक्षा दिलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. ही खळबळजनक घटना सोमवारी (३ मार्च २०२५) तालुक्यातील सती येथे उघडकीस आली आहे. ही अल्पवयीन विद्यार्थिनी आपल्या कुटुंबीयांसोबत सती येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे. याबाबत चिपळूण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.हे कुटुंब उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती
शहरातील डीबीजे महाविद्यालयात ही विद्यार्थिनी बाराव्या वर्गात शिकत होती. तिने आताच बारावीची परीक्षा दिली होती. अल्पवयीन विद्यार्थिनीचं कुटुंब हे मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे. हे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून सती येथे वास्तव्यास राहत आहेत. या विद्यार्थिनीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर तिने राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याची दोर कापली. अल्पवयीन विद्यार्थिनीने अशा प्रकारे आपल्या आयुष्याची अखेर केल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर चिपळूण शहरात एकच खळबळ माजली. घटनेनंतर तात्काळ या घटनेची माहिती पोलिस स्थानकात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. या विद्यार्थिनीने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचा पाऊल उचललं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश महाडिक करत आहेत.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ROc7JYS
No comments:
Post a Comment