
मुंबई- यांच्या 'सूर्यवंशम' चित्रपटातील अभिनेत्री सौंदर्याच्या निधनानंतर २२ वर्षांनी या घटनेने एक नवीन वळण घेतले आहे. सौंदर्याचा २२ वर्षांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला असे म्हटले जात होते. आता, त्यांच्या मृत्यूच्या इतक्या वर्षांनंतर, खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'सूर्यवंशम' चित्रपटात उत्तम अभिनय करणाऱ्या सौंदर्याचा २२ वर्षांपूर्वी विमान अपघातात दुःखद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने प्रेक्षकांनाही धक्का बसला होता. विमान अपघातात झालेला मृत्यू 'सूर्यवंशम' चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत दिसलेली राधाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री सौंदर्याने साकारली होती. तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या सौंदर्या अमिताभ यांच्या या चित्रपटातून हिंदी प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करू लागल्या. सौंदर्यांच्या मृत्यूचे कारण विमान अपघात असल्याचे सांगितले जाते आणि या घटनेत कुटुंबातील तीन सदस्यांना आपला जीव गमवावा लागला होता. सौंदर्यांचा मृतदेह सापडला नाही. त्यांच्या शेवटच्या काळात, अभिनेत्री सौंदर्या त्यावेळी गर्भवती होत्या. आता, अभिनेत्रीच्या मृत्यूच्या २२ वर्षांनंतर, प्रसिद्ध टॉलीवूड अभिनेते मोहन बाबू यांच्याविरुद्ध अचानक तक्रार दाखल करण्यात आली आहे. सौंदर्याच्या मृत्यूमध्ये मोहन बाबूचा हात असल्याचा आरोप आहे. १७ एप्रिल २००४ रोजी एका खाजगी प्लेन अपघातात या अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता. आता, असे म्हटले जात आहे की ती अभिनेत्री करीमनगरमध्ये भाजप आणि तेलुगू देसम पक्षाच्या एका राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती, त्याच दरम्यान तिच्या भावाचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर सौंदर्याचा मृतदेह सापडला नव्हता. विमान अपघातानंतर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप न्यूज १८ च्या वृत्तानुसार, अभिनेत्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की सौंदर्याचा मृत्यू हा अपघात नसून तर मोहनसोबतच्या मालमत्तेच्या वादातून झालेला खून होता. तक्रारदाराने मोहन बाबूवर जमीन विकण्यासाठी त्या भावा बहिणीवर दबाव आणल्याचा आणि प्लेन क्रॅशनंतर बेकायदेशीरपणे त्या जमीनीवर कब्जा केल्याचा आरोप केला आहे. तक्रारदाराचे नाव चित्तमुल्ला असल्याचे सांगितले जाते. त्याने सांगितले की त्याच्या जीवाला धोका आहे त्याच्या तक्रारीत मांचू कुटुंबातील सुरू असलेल्या वादाबद्दलही सांगितले आहे तसेच मांचू मनोजला न्याय देण्याची आणि जलपल्ली येथील ६ एकरच्या जागेत बांधलेले अतिथीगृह जप्त करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर तक्रारदाराने म्हटले आहे की मोहन बाबूमुळे त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याने पोलिस संरक्षण देखील मागितले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mrTXdnA
No comments:
Post a Comment