Breaking

Monday, March 10, 2025

रोहित शर्माची पत्नी रितिका करते तरी काय, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर सुरु झाली एकच चर्चा https://ift.tt/qp43B1T

दुबई : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर सर्वात चर्चेत आली ती रोहित शर्माची पत्नी रितिका. कारण रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर आपल्या पत्नीकडे गेला आणि तो भावूक झाला होता. रोहित शर्मा डोळ्यात यावेळी आंनदाश्रू आले होते आणि आपल्या भावना त्याने पत्नी रितिकाबरोबर शेअर केल्याचे पाहायला मिळाले.

पहिली भेट कुठे झाली होती...

रोहित शर्मा आणि रितिका यांच्या पहिल्या भेटीचा भन्ना किस्सा आहे. एका जाहिरातीचे शुटिंग सुरु होते आणि त्यासाठी रोहित शर्मावर सेटवर दाखल झाला होता. त्यावेळी रोहित आणि रितिका यांची पहिली भेट झाली. यावेळी या जाहिरातीमध्ये नेमकं काय करायचं आहे, ते रितिकाने रोहितला सांगितले होते.

रोहित शर्माला मिळाली होती धमकी...

रोहित शर्मा आणि रितिका यांच्यात संवाद सुरु होता. त्यावेळी रोहित शर्माला धमकी दिली होती ती युवराज सिंगने. रितिकाकडे वाईट नजरेने पाहू पण नकोस, असे युवराज सिंगने रोहित शर्माला धमकावले होते. त्यानंतर सर्वांना समजले की, रितिकाला युवराज सिंग हा बहीण मानत होता.

आवडत्या जागी केलं रोहितने प्रपोज...

रोहित शर्माला रितिका आवडत होती. पण तिला प्रपोज कुठे करायचं, हा प्रश्न रोहित शर्माला पडलेला होता. पण रोहित शर्माने रितिकाला प्रपोज करण्यासाठी आपली आवडती जागा निवडली. ज्या बोरिवलीच्या जनरल अरुण कुमार मैदानात रोहितने क्रिकेटचा श्रीगणेशा केला होता. त्याच मैदानात रोहितने रितिकाला प्रपोज केलं.

रितिका नेमकं करते तरी काय...

रितिका ही एक स्पोर्ट्स मॅनेजर आहे. लग्नापूर्वी रितिका ही विराट कोहलीबरोबर काम करत होती. रितिका ही विराट कोहलीचे पेप्सी, आदिदास, ऑडी, टिसॉटसारखे ब्रँड्स पाहत होती. पण रितिकाने विराट कोहलीबरोबर काम करणं सोडलं आणि त्यानंतर काही वर्षातच रितिकाचे रोहितबरोबर लग्न झालं. त्यानंतर रितिका ही रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवता येऊ शकते, ही गोष्ट पाहते. त्यामुळे रोहित शर्माला आपले ब्रँड्स हाताळण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही किंवा कोणी मॅनेजरही ठेवावा लागत नाही. रितिकाचे रोहितच्या आयुष्यात फार मोठे योगदान आहे. कारण रितिका फक्त त्याचे घर आणि मुलांना सांभाळत नाही तर ती रोहितच्या व्यायसायिक गोष्टींमध्येही मोलाची भूमिका बजावत आहे.रितिकाला आपण फक्त आयुष्याची मजा लुटताना टीव्हीवर पाहतो. पण रितिका ही रोहितसाठी फार मोठं काम करत असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळेच रोहित शर्माला आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करता येतं. त्यामुळे रोहितच्या आयुष्यात रितिकाचं असणं सर्वात महत्वाचं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/crhlCve

No comments:

Post a Comment