
बंगळुरु : कर्नाटकातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बेंगळुरूमधील बांदीपूरजवळील एका रिसॉर्टमधून एक कुटुंब अचानक बेपत्ता झाले आहे. यामुळे सारेच पेचात पडले आहेत. काहीजण या घटनेला भूतप्रेताचा परिणाम सांगत आहेत. तर काहीजण याचा संबंध मोठ्या गुन्ह्याशी जोडत आहेत. या प्रकरणी एक दोन नाहीतर तीन राज्यांच्या पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू पोलिसांकडून कुटुंबातील सदस्यांचा शोध सुरु आहे. गुंडलुपेट पोलिसांच्या माहितीनुसार, ४० वर्षीय जे निशांत, त्यांची पत्नी चंदना आणि त्यांचा १० वर्षांचा मुलगा २ मार्चला कंट्री क्लब रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी गेले होते. त्यादिवशी ते रिसॉर्टमध्येच दिसत होते. पण दुसऱ्या दिवशी अचानक ते गायब झाले. रिसॉर्टमधील लोकांनी दावा केला की, त्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे सामान रिसॉर्टच्या खोलीतच सोडले आणि त्यांच्या गाडीतून कुठेतरी निघून गेले आणि परत आलेच नाही. पोलिसांनी सांगितले की, कुटुंब त्यांच्या कारने बांदीपूर वनक्षेत्रातील मंगला रोडवर गेले होते आणि तेथून ते गायब झाले. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सामानाची झाडाझडती घेतली पण काहीही हाती लागलेले नाही.प्राथमिक तपासातून असे दिसून येतेय की, निशांतने बनावट ब्रुहत बेंगळुरू महानगरपालिका (BBMP) कर्मचारीचा आयडी वापरून रिसॉर्टमध्ये खोली बुक केली होती. चौकशीत मात्र तो बेरोजगार असल्याचे उघडकीस आले आहे. निशांत हा गंभीर आर्थिक तणावाखाली होता आणि त्याने मोठे कर्ज घेतले होते. यासाठीच तो सावकारांना टाळत असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलीस याप्रकरणातील विविध कंगोरे तपासत आहेत. ज्यामध्ये कर्जदारांकडून अपहरण होणे किंवा जंगलात स्वेच्छेने गायब होणे अशा शक्यता आहेत. पोलिसांनी सांगितले की, तपास अजूनही सुरू आहे, त्यामुळे या घडीला काहीही सांगणे कठीण आहे. सध्या, पोलिस तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील म्हैसूर शहरात त्याचा शोध घेत आहेत. याव्यतिरिक्त घटनेबद्दल अधिक माहिती अद्याप कळू शकलेली नाही.ही घटना अतिशय चिंताजनक आहे. एक संपूर्ण कुटुंब अचानक कसे गायब होऊ शकते? ते काही अडचणीत आहेत का? त्याचे कोणी अपहरण केले आहे का? की त्याने स्वतःहून जंगलात जाण्याचा निर्णय घेतला? पोलीस तपास करत आहेत आणि लवकरच हे गूढ उलगडेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, परिसरात विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही लोक असा दावा करत आहेत की, कुटुंबाच्या बेपत्ता होण्यामागे भूतप्रेताचा प्रकारही असू शकतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mOZVEze
No comments:
Post a Comment