
दुबई: २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयने आपले खेळाडू पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये होणार होते. पण आता टीम इंडियाचा जोरदार विजय पाहून पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे असे मत आहे की सर्व सामने दुबईमध्ये होत असल्याने भारताला इतर संघांपेक्षा अन्याय्य फायदा मिळत आहे. या स्पर्धेत आता हा एक मोठा मुद्दा बनला आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी, भारतीय कर्णधाराने या वादावर आपले मौन सोडले आहे आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले आहे.
'हे आमचे घर नाही'
रोहित शर्माचा असा विश्वास आहे की,"दुबईमध्ये एकाच मैदानावर सर्व सामने खेळूनही भारतीय संघाला कोणताही अन्याय्य फायदा मिळत नाही. दुबईचे मैदान हे टीम इंडियाचे 'होम वेन्यू' नाही. आमच्या खेळाडूंसाठीही हा एक नवीन अनुभव आहे. आम्ही येथे ३ सामने खेळलो आणि तिन्ही वेळा खेळपट्टी वेगळी होती. प्रत्येक वेळी मला एका नवीन आव्हानाला तोंड द्यावे लागत असे. हे आमचे घर नाही, हे दुबई आहे. आम्ही इथे जास्त सामने खेळत नाही आणि हे आमच्यासाठीही नवीन आहे." रोहित पुढे म्हणाला, "येथे ४-५ पृष्ठभाग वापरले जात आहेत. उपांत्य सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळला जाईल हे मला माहित नाही. पण काहीही झाले तरी आपल्याला स्वतःला त्यानुसार जुळवून घ्यावे लागेल. आम्ही त्यानुसार खेळायला जाऊ. न्यूझीलंडविरुद्ध, सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होत असल्याचे आम्हाला दिसून आले. पण पहिल्या दोन सामन्यांमध्ये आमचे गोलंदाज गोलंदाजी करत असताना हे दिसून आले नाही. मागील सामन्यात फारशी फिरकी नव्हती, पण न्यूझीलंडच्या सामन्यात बरीच फिरकी दिसून आली. याचा अर्थ असा की प्रत्येक पृष्ठभागावर काहीतरी वेगळे घडत आहे. त्यामुळे, मैदानावर काय होणार आहे आणि काय नाही हे आपल्याला माहित नाही."उपांत्य फेरीत खेळपट्टी कशी असावी?
उपांत्य सामन्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला, "जर खेळपट्टी गोलंदाजांना थोडी मदत करत असती तर सामना रंजक झाला असता." मला यात काही अडचण नाही. तुम्हाला असा पृष्ठभाग हवा आहे जो तुम्हाला स्पिन किंवा सीमने आव्हान देईल. आम्हाला चांगली लढत हवी आहे. त्याने गेल्या २ महिन्यांत ILT20 लीगमध्ये खेळलेल्या सामन्यांच्या आधारे खेळपट्टीचा अंदाज लावला. टीम इंडियाच्या यशाचे रहस्य शक्य तितक्या लवकर खेळपट्टीशी जुळवून घेणे हे आहे असे त्याचे मत आहे."from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xHvTBrc
No comments:
Post a Comment