बंगळुरु : विराट कोहलीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने धावांचा डोंगर उभारत दमदार विजय साकारला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरसीबीच्या संघाने यावेळी घरच्या मैदानात दमदार विजय साकारला. विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने २०५ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने १९ चेंडूंत ४९ धावांच दमदार खेळी साकारली. पण तो बाद झाला आणि राजस्थानचा अडचणीत आला. ध्रुव जुरेल यावेळी संघाला विजयाची आशा दाखवत होता, पण तो विजय मिळवून देणार नाही, याची खात्री आरसीबीला होती. त्यामुळेच आरसीबीने या सामन्यात राजस्थानवर ११ धावांनी दमदार विजय साकारला.विराट कोहली आणि फिल साॉल्ट यांनी आरसीबीला भन्नाट सुरुवात करून दिली. राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने भेदक सुरुवात केली होती. त्यामुळे कोहली आणि सॉल्ट यांनी सावधपणे गोलंदाजी खेळून काढली. पण त्यानंतर मात्र या दोघांनी दमदार फटकेबाजी केली. पॉवर प्लेमध्ये त्यांनी एकही विकेट गमावली नाही. पण पॉवर प्लेनंतर सॉल्ट बाद झाला आणि ही जोडी फुटली. या दोघांन मिळून आरसीबीला ६१ धावांची सलामी करून दिली. सॉल्ट बाद झाला तरी विराट मात्र धडाकेबाज फटकेबाजी करत राहीला. विराटने अर्धशतक पूर्ण केले. विराट शतकाच्या दिशेने निघाला होता.विराटचा खेळ पाहता तो यावेळी शतक पूर्ण करेल, असे वाटत होते. विराटला यावेळी देवदत्त पडीक्कल चांगली साथ देत होता. पडीक्कलने यावेळी अर्धशतक झळकावले होते. पण त्याचवेळी आर्चरने विराटला बाद केले. विराटने यावेळी ८ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७० धावांची खेळी साकारली. विराट बाद झाल्यावर पडीक्कलही लवकर बाद झाला. पडीक्कलने यावेळी ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. हे दोघेही एकामागोमाग एक बाद झाले. पण त्यानंतर टीम डेव्हिड आणि जितेश शर्मा यांनी अखेरच्या षटकात दमदार फटकेबाजी करत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला.आरसीबीच्या २०६ धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. पण या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. वैभव यावेळी १६ तर यशस्वी १९ चेंडूंत ४९ धावांवर बाद झाला. राजस्थानची मधली फळी चांगली खेळत नव्हती, पण ध्रुव जुरेलने यावेळी राजस्थानचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण तो सामना जिंकवेल, असे मात्र वाटत नव्हते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AlJSHha
No comments:
Post a Comment