मुंबई : पहलगामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Tarr २८ निष्पाप पर्यटकांना प्राण गमवावे आहेत. तर काही पर्यटक अद्यापही काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रशासन आणि संबंधित राज्यांचे सरकार या कामात गुंतली आहे. यातच केंद्र सरकारने कॅबिनेट कमिटी ऑप सेक्युरिटी (CCS) तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी भारताच्या सुरक्षेसह विविध विषयांवर चर्चा पार पडली आहे. दरम्यान, पंतप्रधान यांच्या हस्ते १९ एप्रिलला दिल्ली-श्रीनगर-कटरा एक्सप्रेसचे उद्घाटन होणार होते, पण ते पुढे ढकलले गेले. यावर बोट ठेवत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. संजय राऊतांनी आपल्या एक्स हँडलवर ट्विट करत म्हटले की, दिल्ली-श्रीनगर-कटरा वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी होणार होते, आज हजारो पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. विमान कंपन्या लुटमार करत आहेत, ही ट्रेन सेवा त्वरित सुरू करावी, जेणेकरून हजारो पर्यटक त्यांच्या राज्यात परतू शकतील.' यासोबत राऊतांनी सुरक्षा कॅबिनेट समितीच्या बैठकीतला एक फोटो देखील पोस्टसोबत नमूद केला आहे. संजय राऊतांच्या या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. भारताने पाकिस्तानशी असणाऱ्या जुन्या सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर अटारी-वाघा सीमेवरील एकात्मिक तपासणी नाका तात्काळ बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासोबतच भारताने आता पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसा कायमचा बंद केला आहे. तर जे पाकिस्तानी नागरिक सध्या भारतात आहेत त्यांना देखील पुढच्या ४८ तासांत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.केंद्र सरकारने भारतातील पाकिस्तानी दुतावास बंद करण्याचाही मोठा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानच्या हायकमिशनच्या ५ अधिकाऱ्यांना देखील हटवण्यात आलं आहे. तर पाकिस्तानच्या लष्करी अटॅचीलाही एक आठवड्यात भारत सोडण्यास सांगितले आहे. यामुळे पाकिस्तानवर आता भारताकडून निर्बंध लादल्याने द्विपक्षीय संबंध कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ea9QgKI
No comments:
Post a Comment