Breaking

Friday, April 25, 2025

धोनी ४०० व्या मॅचमध्ये फेल, चेन्नईवर मोठी नामुष्कीची वेळ, हैदराबादने साकारला मोठा विजय https://ift.tt/Ajzwn8t

चेन्नई : महेंद्रसिंग धोनी आपल्या ४०० व्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण धोनी या सामन्यात फलंदाजी आणि नेतृत्वात पुरता अपयशी ठरला आणि त्यामुळेच संघाला पराभवाचा धक्का बसला. चेन्नईच्या संघावर यावेळी नामुष्कीची वेळ आली. कारण त्यांना आपल्या घरातच हा पराभ पत्करावा लागला आहे. चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करताना १५४ धावांत ऑल आऊट झाला होता. हैदराबादने हे आव्हाव लीलया पेलले आणि त्यांनी मोठा विजय साकारला. चेन्नईचा हा या आयपीएलमधील सातवा पराभव ठरला आहे. हैदराबादने यावेळी पाच विकेट्स राखून विजय मिळवला.चेन्नईच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण पहिल्याच चेंडूवर त्यांना धक्का बसला. पण त्यानंतर आयुष म्हात्रेने यावेळी सामन्यात रंगत आणली. कारण आयुषने यावेळी हैदराबादच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पण यावेळी मोठा फटका मारताना आयुष बाद झाला आणि चेन्नईला मोठा धक्का बसला. कारण आयुषने यावेळी १९ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ३० धावांची खेळी साकारली होती. आयुष बाद झाल्यावर चेन्नईची धावगती मंदावली होती. पण त्यानंतर या सामन्यात पदार्पण करणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिसने सामन्यात रंगत आणली. कारण त्याने २५ चेंडूंत १ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ४२ धावांची खेळी साकारली. यावेळा त्याची अप्रतिम कॅच कामिंडू मेंडिसने पकडली. धोनी, जडेजा, शिवम दुबे या सामन्यात फलंदाजीत अपयशी ठरले.चेन्नईने हैदराबादला विजयासाठी १५५ धावांचे सोपे आव्हान ठेवले होते. पम चेन्नईने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. कारण त्यांनी अभिषेक शर्माला शून्यावर बाद केले. अशान किशनने ४४ धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. ट्रेव्हिस हेड, हेन्रीच क्लासिन यावेळी मोठी फटकेबाजी करू शकले नाही. पण त्यानंतर पुन्हा एकदा कामिंडू मेंडिस संघाच्या मदतीला धावून आला. मेंडिसने यावेळी २२ चेडूंत नाबाद ३२ धावांची खेळी साकारली आणि हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/08TjYp6

No comments:

Post a Comment