चेन्नई : घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सचा ़पराभव झाला. चेन्नईच्या संघावर ही नामुष्कीची वेळ होती. पण त्याचवेळी मुंबईकर आयुष म्हात्रेला मात्र एक खास पुरस्कार देण्यात आला आहे. कारण या सामन्यात आयुष म्हात्रेने जे काही केलं ते कोणालाच जमलं नाही.आयुष म्हात्रेचा हा चेन्नईकडून दुसऱ्यांदाच मैदानात उतरला होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात वानखेडे मैदानावर धोनीने त्याला पहिली संधी दिली होती. या पहिल्याच सामन्यात आयुषने चमक दाखवली होती. त्यामुळेच त्याला आता दुसऱ्या सामन्यातही संधी देण्यात आली. आयुषने संघाला दमदार सुरुवात करून दिली. आयुष खेळत असताना चेन्नईचा संघ मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण आयुष बाद झाला आणि त्यानंतर चेन्नईच्या धावगतीला मोठा ब्रेक बसला. त्यानंतर आयुषने चांगले क्षेत्ररक्षणही केले. पण या सामन्यात आयुषने अशी एक गोष्ट केली, जी कोणालाही जमलीच नाही.चेन्नईला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. शेख रशीद शून्यावर बाद झाला. सॅम करनही ९ धावाच करु शकला. चेन्नईचा डाव अडचणीत आला होता. चेन्नईचा संघ १५० धावा तरी करेल की नाही, असे वाटत होते. पण त्यावेळी आयुष म्हात्रे संघाच्या मदतीला धावून आला. आयुषने यावेळी तुफानी फटकेबाजी केली. आयुषने यावेळी फक्त १९ चेंडूंत ३० धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यामध्ये सहा चौकारांचा समावेश होता आणि त्यासाठीच आयुष म्हात्रेला यावेळी खास पुरस्कार देण्यात आला. आयुषने ३० धावा केल्या म्हणून नाही तर त्याने सहा चौकार मारले म्हणून त्याला खास पुरस्कार देण्यात आला. कारण या सामन्यात कोणत्याही खेळाडूला सहा चौकार मारता आले नाहीत. आयुष म्हात्रेने जे सहा चेंडूंत केलं ते कोणत्याही खेळाडूला यावेळी जमलं नाही. त्यामुळेच आयुशला सुपर फोर हा खास पुरस्कार यावेळी देण्यात आला.आयुष म्हात्रे फक्त दोनच सामने खेळला आहे. पण या दोन्ही सामन्यांत त्याने त्याची चमक दाखवली आहे. त्यामुळे ता पुढच्या सामन्यांमध्ये तो कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ADhSQ36
No comments:
Post a Comment