नवी दिल्ली : विराट कोहलीच्या घरच्या मैदानात आरसीबीने विजय साकारल्याचे पाहायला मिळाले. पण विराटच्या घरच्या मैदानात कृणाल पंड्याने सर्वांची मनं जिंकली. कृणालने चौथ्या स्थानावर .येऊनही विराटपेक्षा जास्त धावा केल्या आणि तोच संघासाठी मॅचविनर ठरला. दिल्लीच्या संघातील एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही, पण तरीही त्यांनी १६२ धावा रचल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला एकामागून एक तीन धक्के बसले. पण त्यानंतर कृणाल पंड्याने विराट कोहलीला साथीला घेत दमदार फलंदाजी केली आणि सामना रंगतदार अवस्थेत आणला होता. कृणालने धडाकेबाज फलंदाजी करत दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय साकारला. विराटने यावेळी ५१ धावा केल्या, तर कृणाल पंड्याने नाबाद ७३ धावांची अप्रतिम खेळी साकारली. आरसीबीचा संघ दिल्लीच्या १६३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा. पण आरसीबीच्या संघाची ३ बाद २६ अशी बिकट अवस्था झाली होती. त्यानंतर कृणाल पंड्या फलंदाजीला आला आणि त्याने विराट कोहलीला आपल्या साथीला घेतली. या सामन्यात विराटपेक्षा कृणाल अप्रतिम खेळला आणि विराट फक्त त्याचा खेळ पाहत राहीला. कृणाल चौथ्या स्थानावर आला, पण विराटपूर्वी त्याने अर्धशतक पूर्ण केले. विराटने संथ फलंदाजी करताना आपवे अर्धशतक पूर्ण केले आणि पीचवर त्याने जास्त वेळ घालवण्याचे काम चोख बजावले. कृणालची फटकेबाजी आणि त्याला विराटची सााथ मिळाली. त्यामुळेच आरसीबीच्या संघाला विराट कोहलीच्या घरच्या मैदानात सामना जिंकता आला.दिल्लीचा संघ आपल्या घरच्यामैदानात प्रथम फलंदाजी करायला उतरली होती. दिल्लीचा चांगली सुरुवात झली नव्हती आणि त्यांची २ बाद ४४ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर संघात परतलेला फॅफ ड्यु प्लेसिस हा २२ धावांवर बाद झाला, दिल्लीसाठी हा तिसरा धक्का होता. पण त्यानंतर K L Rahul ने दमदार फलंदाजी केली. राहुलने यावेळी तीन चौकारांच्या जोरावर ४१ धावांची खेळी साकारली. त्यानंतरच्या फलंदाजांनी उपयुक्त खेळी साकारल्या आणि त्यामुळेच दिल्लीच्या संघाला त्यांच्याच घरात १६२ धावा करता आल्या.आरसीबीच्या संघाकडून यावेळी भुवेनश्वर कुमारने तीन बळी मिळवले, तर जोश हेझलवूडने दोन विकेट्स मिळवत त्याला चांगली साथ दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Um1KVOb
No comments:
Post a Comment