प्रदिप भणगे, डोंबिवली: विविध गुन्ह्यांमध्ये आणि विविध पोलीस ठाण्यात एकूण १३ गुन्हे दाखल असलेल्या ठाकुर्लीतील रिल स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५३) यांच्यावर नाशिक येथील एका तरूणीने दोन दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता एका घटस्फोटीत महिलेने सुरेंद्र यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करून त्यांच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन वरिष्ठांच्या आदेशावरून तपास सुरू केला आहे.
महिलेने रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत काय म्हटलं?
पीडित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे की, भागातील विकासक यांच्या मालकीच्या गाळ्यात आपण एक व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाला चांगली गती मिळाली नाही. त्यामुळे तो व्यवसाय आपण आर्थिक नुकसानीमुळे बंद केला. गाळ्यामध्ये काही तांत्रिक यंत्रणा होती. गाळ्यातील ही यंत्रणा परत घेण्यासाठी आपण सुरेंद्र पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी गाळ्यातील यंत्रणा परत देण्याचे आश्वासन देत आपल्यावर सुरेंद्र पाटील यांनी लैंंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप महिलेने रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.चार दिवसांपूर्वी सुरेंद्र पाटील यांनी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या पुणे येथील एका तरूणीला तुला एअर हॉस्टेसं म्हणून नोकरिला लावतो असे आमिष दाखवून तिला डोंबिवलीत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. सुरेंद्र पाटील यांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली. आपल्यावर सुरेंद्र व त्यांच्या चालकाने लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी सुरेंद्र यांनी आपल्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली होती, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.पैशांचा पाऊस, नोटांची उधळण, पोलीस ठाण्यातील खुर्चीवर बसून रिल
भोंदु बाबांच्या उपस्थितीत पैशांचा पाऊस, नोटांची उधळण, पोलीस ठाण्यातील खुर्चीवर बसून रिल बनवणे अशा विविध कारनाम्यांमुळे सुरेंद्र पाटील समाज माध्यमांतून प्रसिध्द आहेत आणि त्याला महागातही पडले आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/eZj7cV0
No comments:
Post a Comment