Breaking

Friday, April 4, 2025

मुंबईचा 'हार्दिक' पराभव, सूर्याचे अर्धशतक व्यर्थ, मुंबईकर शार्दुलने रोखला मुंबईचा विजय रथ... https://ift.tt/V2v8PiJ

लखनौ : हार्दिक पंड्याच्या अथक प्रयत्नांनंतरही मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला. हार्दिकने पाच विकेट्स मिळवले होते, पण अखेरच्या षटकात दमदार फलंदाजी करण्यात तो अपयशी ठरला आणि त्यामुळे मुंबईला सामना गमवावा लागला. शार्दुल ठाकूरने १९ व्या षटकात सात धावा दिल्या आणि तिथे हा सामना फिरला. लखनौच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २०३ धावांचा डोंगर उभारला होता. आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात वाईट झाली. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर मुंबईच्या संघाने आपले आव्हान जीवंत ठेवले होते. सुर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले खरे, पण तो बाद झाला आणि सामना मुंबईने गमावला. लखनौने यावेळी १२ धावांनी सामना जिंकला.लखनौच्या २०४ धावांचा पाठलाग करताना मुंबईची २ बाद १७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादवने संघाची पडझड थांबवली. नमनने यावेळी २४ चेंडूंत ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४६ धावांची दमदार खेळी साकारली. नमनचे अर्धशतक हुकले, पण त्यानंतर सूर्याने दमदार फलंदाजी केली. सूर्याला यावेळी तिलक वर्माची चांगली साथ मिळाली. सूर्याने यावेळी ६७ धावांची खेळी साकारली. पण सूर्या बाद झाला आणि त्यानंतर मुंबईच्या हातून हा सामना निसटला. हार्दिकने लखनौला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांनी या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला. कारण लखनौच्या दोन्ही सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि एकही विकेट त्यांना मिळवू दिली नाही. पण त्यानंतर मात्र मुंबईच्या संघाने आपल्या गोलंदाजीत थोडा बदल केला आणि त्यांना विकेट्स मिळायला लागले. मिचेल मार्शने यावेळी मुंबईची गोलंदाजी चांगलीच फोडून काढली. मार्शने ३१ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर ६० धावांची तुफानी खेळी साकारली. त्यामुळे लखनौच्या संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करता आली.मार्श बाद झाला. पण दुसरीकडे एडन मार्करमने संघाला दीडशे धावांपर्यंत सहज पोहोचवले. कारण मार्करमने अर्धशतक झळकावत मुंबईच्या गोलंदाजीवर प्रहार सुरु ठेवला होता. मार्करमने ३८ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. आयुष बदोनी आणि डेव्हिड मिलर यांनी अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केल्यामुळे संघाला २०० धावांचा पल्ला गाठता आला. मुंबईच्या संघाकडून यावेळी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो हार्दिक पंड्या. हार्दिकने या सामन्यात ३६ धावा देत पाच बळी मिळवले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8mgBkCl

No comments:

Post a Comment