Breaking

Saturday, April 26, 2025

वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक, प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी https://ift.tt/GpruS12

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात अटकेत आहे. सीआयडीकडे त्याच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्याचा मुक्काम पुढचे अनेक दिवस जेलमध्ये राहणार असल्याची शक्यता आहे. असं असताना त्याच्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. वाल्मिक कराड याला जेलमध्ये पॅनिक अटॅक आल्याची माहिती. त्याला पॅनिक अटॅक आल्याने डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आहे. वाल्मिक कराड याला दुपारच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागलं. त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्याची माहिती आहे. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर साहजिकच डॉक्टरांकडून त्याला योग्य तो औषोधपचार दिला जाईल. वाल्मिक कराडच्या पॅनिक अटॅकच्या वृत्तावर कुणाकडून काही नवीन माहिती दिली जाते का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

डॉक्टरांचा रक्त चाचण्या करण्याचा सल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वाल्मिक कराडची आज अचानक प्रकृती बिघडली. त्याला दुपारच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. त्याची प्रकृती बिघडल्याने जेल प्रशासनाने तातडीने त्याची दखल घेत डॉक्टरांना बोलावले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला. रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार केला जाणार असल्याची माहिती आहे.वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराड यानेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा सीआयडीचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन सीआयडीने कोर्टात चार्जशीट देखील फाईल केली आहे. यामध्ये सीआयडीने कराड आणि इतर आरोपींच्या विरोधात अनेक पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. कराडच्या वकिलांनी मधल्या काळात जामिनासाठी देखील अर्ज केला होता. पण त्याला दिलासा मिळालेला नाही. कराड हा या प्रकरणात स्वत:हून सीआयडीला शरण गेला आहे. तो त्याआधी अनेक दिवस बेपत्ता होता. नंतर तो मोठ्या थाटात सीआयडी कार्यालयात जावून सरेंडर झाला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DSQqyi6

No comments:

Post a Comment