जयपूर : मुंबई इंडियन्स एकदा का फॉर्मात आली की तिचा नाद करायचा नाही, हे पुन्हा एकदा आयपीएलच्या व्यासपीठावर पाहायला मिळाले. रोहित शर्मा आणि रायन रिक्लेटन यांनी तुफानी सुरुवात करून दिली. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी धमाकेदार फटकेबाजी केली. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला २१७ धावांचा डोंगर उभारता आला. राजस्थानचा संघ फलंदाजीला उतरला, पण मुंबईच्या गोलंदाजीपुढे त्यांनी लोटांगण घातले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला १०० धावांनी मोठा विजय साकारता आला आणि त्यांनी राजस्थानचे आव्हान संपुष्टात आणले.रोहित आणि रायन याचं तुफान जयपूरच्या मैदानात घोंघावलं. दुसऱ्याच षटकात रोहित शर्माला पंचांनी बाद दिले होते, पण रोहितने डीआरएस घेतला आणि त्याचा निर्णय योग्य ठरला. जीवदानानंतर रोहित शर्माची फलंदाजी चांगलीच फुलली. रोहित शर्माने यावेळी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहित आणि रायन या जोडीने १२ षटकात ११६ धावांची सलामी दिली. रायन यावेळी ६१ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. पण त्यानंतर रोहित शर्माने धमाकेदार फटकेबाजी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर रोहित मोठी खेळी साकारेल, असा वाटत होते. पण यामध्ये त्याला अपयश आले. रोहितने यावेळी ६ चौकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाला आणि त्यानंतर सूर्या आणि हार्दिक यांची जोडी चांगलीच जमली.हार्दिक आणि सूर्या यांनी अखेरच्या षटकात दणदणीत फटकेबाजी केली. या दोघांनीही प्रत्येकी नाबाद ४८ धावांची खेळी साकारली, या दोघांनी ही खेळी प्रत्येकी २३ चेंडूंत साकारली. त्यामुळे मुंबईच्या संघाला या सामन्यात राजस्थानपुढे २१८ धावांंचेे आव्हान ठेवता आले.मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला सुरुवातीपासून धक्के बसायला सुरुवात झाली. यामधून राजस्थानचा संघ सावरू शकला नाही. राजस्थानचा अर्धा संघ ४७ धावांतच माघारी परतला आणि तिथेच त्यांचा पराभव अटळ झाला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि हार्दिक पंड्या यांनी अचूक गोलंदजी केली. त्यामुळेच मुंबईच्या संघाला या सामन्यात दमदार विजय साकारता आला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dRYwtlT
No comments:
Post a Comment