: एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी आरोपींचा शोध घेत असलेल्या पोलिसांसोबत काही तरूणांनी धककाबुक्की केली. या प्रकरणी दीपक उत्तम दाभाडे (वय ३८, रा. नागसेन नगर उस्मानपुरा) आणि अजय भीमराव काकडे (वय ३२ रा. नागसेन नगर उस्मानपुरा) या दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपीड ॲक्शन फोर्समध्ये कार्यरत असलेले अंमलदार नंदकुमार आव्हाळे यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते जयंती मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर होते. क्रांती चौक ते सिल्लेखाना दरम्यान ते पेट्रोलिंग करीत असताना एक तरुणी रडत होती. या तरुणीला पोलिस उपायुक्त यांनी विचारणा केली असता तिची गर्दीतील काही जणांनी छेड काढल्याचे सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी छेड काढणाऱ्या तरुणांचा शोध सुरू केला. पोलिसांनी डीजे चालकाला डीजेचा आवाज कमी करण्याबाबत सूचना केली. डीजे चालकाने आवाज कमी न करता डीजेचा आवाज वाढविला. या दरम्यान दीपक दाभाडे व अजय काकडे हे दोघे पोलिसांवर धावून आले. पोलिस अंमलदार उमेश आव्हाळे याची कॉलर धरली. त्यांच्या हातातील लाठ्या ओढण्याचा प्रयत्न करून धक्काबुक्की केली, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. या प्रकरणी लव्हाळे यांच्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसाला सिल्लोड तालुक्यातील मांडणा गावात चंडीका देवीच्या यात्रेत मंदिर परिसरात जोरजोरात कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या दुचाकी स्वाराला हॉर्न कशाला वाजवितो? असे बोलणे पोलिस अंमलदाराच्या कानशिलेत लावून शिवीगाळ केली. पोलिस अंमलदाराला मारहाण करणाऱ्या वाहनधारकाचे नाव संजय रामा लोखंडे (रा. मांडणा, ता. सिल्लोड) असे आहे. अजिंठा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सागर बबन फोलाने (वय २८) १३ एप्रिल रोजी मांडणा येथे चंडीका देवीच्या यात्रेच्या बंदोबस्त कामी आले होते. रात्री ८.४५च्या दरम्यान एका दुचाकीवर एक जण हॉर्न वाजवित वेगाने येत होते. पोलिस अंमलदार फोलाने यांनी दुचाकीस्वाराला तु मोठमोठ्याने हॉर्न का वाजवितो. असे विचारले असता, दुचाकीस्वाराने मी हॉर्न वाजविल तुला काय करायचे असे सांगत शिवीगाळ केली. तु जर गावात पुन्हा दिसलास तर बघ असे सांगून पोलिस अंमलदाराच्या कानफटीत जोराची चापट मारली. शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार ईश्वर शालीग्राम पाटील हे करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KnZdO1l
No comments:
Post a Comment