Breaking

Wednesday, April 16, 2025

IPL 2025 मधली पहिली सुपर ओव्हर, अखेरच्या चेंडूवर कशी पडली विकेट, जाणून घ्या... https://ift.tt/ASPLHQf

नवी दिल्ली : .यंदाच्या आयपीेएलमध्ये पहिला चा सामना बुधवारी पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला दोन धावा हव्या होत्या. पण मिचेल स्टार्कने एकच धाव दिली आणि खेळाडू रन आऊट झाल्यामुळे हा सामान सुपर ओव्हरमध्ये गेला. कारण दोन्ही संघांचे २० षचकांत समान १८८ धावादिल्लीच्या १८९ धावांचा पाठलाग करताना संजून सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांनी संधाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी ६१ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर संजूला दुखापत झाली आणि त्याने मैदान सोडले. त्यानंतर फलंदाजीला आलेला रायन पराग फक्त आठ धावा करू शकला. पण दुसरीकडे यशस्वी जयस्वाल दमदार फटकेबाजी करत होता आणि त्याने अर्धशतक झळकावले होते. पण अर्धशतक पूर्ण केल्यावर तो जास्त काळ खेळू शकला नाही. यशस्वीने यावेळी ३७ चेंडूंत ५१ धावा केल्या.कर्णधार कसा असावा, याचा उत्तम वस्तुपाठ अक्षर पटेलने आपल्या फलंदाजीतही दाखवून दिली. संघाची धावसंख्या वाढत नव्हती, त्यावेळी तो फलंदाजीला आला आणि त्यानंतर धमाकेदार फटकेबाजी करत त्याने संघाची धावगती जोरदार वाढवली. दिल्लीची सुरुवात तुफानी झाली खरी, पण बिन बाद ३४ वरून त्यांची अवस्था २ बाद ३४ अशी झाली होती. त्यानंतर अभिषेक पोरेलने संघाचा डाव सावरला. अभिषेकने धडाकेबाज फटकेबाजी केली खरी, पण त्याचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. पोरेलने ३७ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४९ धावा करता आल्या. दिल्लीकडून केएल राहुलने ३२ चेंडूंत ३८ धावांची खेळी केली, पण त्याला जास्त फटकेबाजी करता आली नाही. पण ही सर्व कसर अक्षर पटेलने भरून काढली.अक्षर पटेल फलंदाजीला आला आणि सुरुवातीपासून त्याने धमाकेदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. अक्षरने यावेळी फक्त १४ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३४ धावा केल्या. अक्षरच्या या फटकेबाजीमुळेच संघाला १८८ धावांचे आव्हान उभारता आले. अक्षरला यावेळी स्ट्रिस्टन स्टब्सची चांगली साथ लाभली स्टब्सने यावेळी १८ चेंडूंत ३४ धावा केल्या. राजस्थानच्या संघाकडून यावेळी जोफ्रा आर्चरने सर्वाधिक दोन बळी मिळवले, तर तुषार देशपांडे चांगलाच महागडा ठरला. तुषार देशपांडेने यावेळी ३ षटकांत सर्वाधिक ३८ धावा केल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/PiHNpju

No comments:

Post a Comment