लखनौ: केएल राहुलने आयपीएलमध्ये सर्वात मोठा विक्रम रचला. विशेष म्हणजे त्याने हा विक्रम त्याच संघाविरुद्ध केला जिथे तो गेल्या वर्षीपर्यंत खेळत होता आणि कर्णधार होता. लखनौविरुद्ध दिल्ली या आजच्या सामन्यात दिल्लीचा ८ विकेट्सनी विजय झाला. हा सामना नाणेफेकीच्या दृष्टीने दिल्लीने जिंकला आणि सामनाही दिल्लीने जिंकला. लखनौचा घरच्या मैदानावर सामना गमावला पण राहुलला मात्र सामन्यानंतर मोठी गुडन्यूज मिळाली.
राहुलने मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम
आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. त्याने १३५ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता, पण आता राहुलने फक्त १३० डावांमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत तिसरे नाव विराट कोहलीचे आहे, ज्याने १५७ डाव खेळून पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला. तर एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये १६१ डाव खेळून इतक्या धावा केल्या होत्या.शिखर धवनबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १६८ डावांमध्ये पाच हजार धावा केल्या आहेत. केएल राहुलने या संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी केली आहे. असे म्हटले जाते की त्याला दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद देण्याची चर्चा होती, परंतु राहुलने स्वतः ते नाकारले आणि अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळाडू म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. ही चाल राहुलसाठी कामी आली, आता तो उत्तम खेळत आहे.राहुलचे शानदार अर्धशतक पूर्ण
या वर्षी आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दोनदा सामने खेळले गेले आहेत. दिल्ली संघाने दोन्ही सामने जिंकले. यापूर्वी, जेव्हा हे दोघे स्पर्धा करत होते, तेव्हा राहुल तिथे नव्हता, पण या सामन्यात राहुल आला आणि त्याने शानदार फलंदाजी करून आपले कौशल्य दाखवले. यादरम्यान त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्याने ४२ चेंडूत ५७ धावांची नाबाद खेळी केली. राहुलने पहिले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर, त्याने आणखी एक धाव घेत आपला ५००० वा धावा पूर्ण केला आणि त्यानंतर त्याने एक शानदार षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. राहुलचे या वर्षीच्या आयपीएलमधील हे तिसरे अर्धशतक आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/a4xt9K0
No comments:
Post a Comment