मुंबई: शिवसेना उबाठाचे खासदार यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत 17 मे रोजी पार पडला. शरद तांदळे यांनी त्यांचे पुस्कर प्रकाशित केले आहे. या खास प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार साकेत गोखले, गीतकार उपस्थित होते. गीतकार जावेदही संजय राऊत यांच्याविषयी भरभरुन बोलले. यांनी क्रिकेटच्या भाषेत संजय राऊत यांचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, 'संजय राऊत हेखील स्वभावाने टी 20 चे खेळाडू आहेत. ते चौकार आणि षटकारच मारतात. ते घाबरतही नाही की स्टम्प आउट होऊ, पण ते चेंडू स्टेडियम बाहेरच टोलवत असतात.'
पाकिस्तानऐवजी नरकात जाईन
जावेद असेही म्हणाले की, कोणत्याही पक्षाच्या बाजूने न बोलता व्यक्त होणाऱ्या नागरिकांची आवश्यकता असते आणि ते त्या श्रेणीतील आहेत. ते म्हणाले की, तुम्ही जेव्हा एका बाजूने बोलता तेव्हा दुसऱ्या बाजूच्यांना तुम्ही नाराज करता, पण जेव्हा तुम्ही सर्व बाजूंनी बोलता तेव्हा अनेकांची नाराजी ओढावता. जावेद म्हणाले की, त्यांना दोन्ही बाजूंनी बोल लावणारे आहेत. ते म्हणाले की, 'मला दोन्ही बाजूचे कट्टरपंथीय शिव्या घालतात. एका बाजूचे म्हणतात की, 'तू काफीर आहेस, तू नरकात जाशील'. तर दुसरीकडचे म्हणतात, 'तू जिहादी आहेस, पाकिस्तानात निघून जा'. जर माझ्याकडे पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील तर मी नरकातच जाणे पसंत करेन'. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला.मुंबईचे कर्ज सात जन्मात फेडू शकणार नाही
यावेळी बोलताना त्यांनी कर्मभूमी मुंबईविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, 'मी 19 वर्षांचा असताना मुंबईत आलो. आज जे काही आहे, जे काही घडलो आहे आणि मी जे काही मिळवलं ते मुंबई आणि महाराष्ट्राने दिलं. हे कर्ज मी सात जन्मातही फेडू शकणार नाही.' त्यांनी पुढे म्हटले की, 'जेव्हा समजू लागलं. तेव्हा उघडपणे बोलू लागलो, तेव्हापासून गेल्या 30 वर्षात मला चार वेळा मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले आहे. त्यातील तीन वेळा मुल्लांनी धमकी दिली होती. मी एकदाही संरक्षण मागितलं नव्हतं. मी कधी रेकॉर्डिंग-शूटिंगवरुन घरी आलो तर पाहिलं की, पोलीस घरी बसले आहेत. कमिशनर साहेबांच्या आदेशावरुन आल्याचे ते सांगायचे.' संजय राऊत यांच्याशी मैत्री कधी झाली याविषयी बोलताना ते हा प्रसंग सांगत होते.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/awrYvG1
No comments:
Post a Comment