नवी दिल्ली : गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरात जाऊन पराभूत केलं. गुजरातने या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आणि त्यासह त्यांनी तीन संघांने धक्के दिल्याचे आता समोर आले आहे. एका विजयानंतर मध्ये एवढा मोठा बदल झाला तरी कसा, हे आता समोर आले आहे. या विजयासह गुजरातचा संघ आता प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. साई सुदर्शनच्या नाबाद १०८ आणि शुभमन गिलच्या ९३ धावांच्या जोरावर गुजरातने दिल्लीच्या संघावर १० विकेट्स राखून मोठा विजय साकारला.लोकेश राहुलच्या शतकाच्या जोरावर दिल्लीच्या संघाने १९९ धावांचा डोंगर उभारला होता. पण गुजरातच्या संघाने धडाकेबाज शतकी सलामी दिली आणि आपला विजय निश्चित केला. साई सुदर्शन आणि शुभमन गिल या दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजीची संपूर्ण हवाच काढून टाकली आणि त्यांना आपल्या पुढे नतमस्तक होण्यास भाग पाडले. पण गुजरातसाठी हा विजय सर्वात महत्वाचा ठरला. कारण या विजयासह गुजरातच्या संघाने १-२ नाही तर तब्बल तीन संघांना धक्के दिले आहेत.गुजरातच्या संघाने या सामन्यापूर्वी ११ लढती खेळल्या होत्या. या ११ सामन्यांमध्ये त्यांनी ८ लढतींमध्ये विजय मिळवले होते, तर तीन पराभव त्यांना स्विकारावे लागले होते. गुजरातच्या संघाने आठ विजयांसह १६ गुण मिळवलेले होते. या १६ गुणांसह गुजरातचा संघ हा पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर होता. गुजरातने दिल्लीच्या संघावर दमदार विजय साकारला आणि त्यांनी दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे गुजरातच्या संघाचे एकूण १८ गुण झाले. या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ अव्वल स्थानावर होता, तर पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता. त्यामुळे १८ गुणांसह गुजरातचा संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला. गुजरातच्या संघाने सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. त्यानंतर १८ गुणांसह पहिले स्थान पटकावत त्यांनी आरसीबी आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांना धक्के दिले. त्यामुळे एका विजयासह गुजरातने तीन संघांना धक्के दिल्याचे समोर आले आहे.गुजरातच्या संघासाठी हा सामना सर्वात महत्वाचा होता. कारण हा सामना जिंकून त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता येऊ शकणार होते. गुजरातच्या संघाने ही संधी साधली आणि त्यांनी प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MHktreS
No comments:
Post a Comment