मुंबई: क्रिकेटपटू आणि त्याच्या चाहत्यांवर टीका करण्यावरुन बिग बॉस फेम गायक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेला. विराटचा उल्लेख करत त्याने 5 मे रोजी शेअर केलेल्या स्टोरीमध्ये असे लिहिले होते की, 'विराट कोहलीचे चाहते विराटपेक्षाही मोठे जोकर आहेत.' याशिवाय त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत विराटने त्याला ब्लॉक केल्याचे सांगितले होते. आता त्याने पुन्हा एकदा त्याने विराटशी संबंधित एक पोस्ट शेअर केली, यावेळी मात्र त्याने विराटचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी विराटविषयी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्रिकेटपटूवर उपहासात्मक टीका केली होती. त्याने असे म्हटलेले की, 'तुम्हा सर्वांना माहितेय की, विराटने मला ब्लॉक केले आहे. तोदेखील इन्स्टाग्रामचा ग्लिच असेल, त्याने मला ब्लॉक केलं नसेल. इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमने विराटला सांगितलं असेल की, मी तुझ्या वतीने राहुल वैद्यला ब्लॉक करतो.' वैद्यने अल्गोरिदमबद्दल बोलण्याचे कारण म्हणजे, राहुलच्या या वक्तव्याच्या काही दिवसांपूर्वी विराटच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अवनीत कौरच्या फॅन पेजवरील एक फोटो लाइक करण्यात आलेला, तो तातडीने अनलाइकही करण्यात आला. 30 एप्रिल 2025 रोजी लाइक-अनलाइकची बाब प्रेक्षकांच्या लक्षात आली. त्यानंतर 2 मे रोजी विराटने अभिनेत्रीचा उल्लेख न करता एक पोस्ट शेअर केलेली, ज्यामध्ये त्याने घडलेल्या घटनेला 'अल्गोरिदम ग्लिच' म्हटलेले.त्यावरुनच राहुलने टोमणा मारला होता. त्यानंतर काही पोस्ट शेअर करत तसेच पापाराझींशी बोलताना त्याने विराटला लक्ष्य केले होते. त्याचे असे म्हणणे होते की, विराटने त्याला का ब्लॉक केले आहे. यावरुन विराटच्या चाहत्यांनी राहुलला प्रचंड ट्रोल केले होते. पापाराझींनीही राहुलला असे म्हटलेले की, विराटकडे त्याला ब्लॉक करण्यासाठी वेळही नाहीये. आता या सगळ्या प्रकरणानंतर विराटने अनब्लॉक केल्याची पोस्ट राहुलने केली आहे.
राहुल वैद्यची लेटेस्ट पोस्ट, गायकाचा घुमजाव!
आता पुन्हा एकदा राहुलने विराटविषयी पोस्ट शेअर केली. त्याने असे लिहिले की, 'अनब्लॉक केल्याबद्दल विराट कोहलीचे आभार. क्रिकेटमधील अद्भूत फलदाजांपैकी तू एक आहेस आणि भारताचा अभिमान आहेस. तुला आणि तुझ्या कुटुंबाला देवाचे आशीर्वाद. तसेच ज्या बालिश लोकांनी माझी पत्नी, बहिणीशी गैरवर्तन केले, माझ्या लहान मुलीचे फोटो मॉर्फ केले आणि मला, माझ्या प्रियजनांना अनेक शिव्या पाठवल्या आणि अजूनही ते ही गोष्ट करत आहेत, देव त्यांना सद्बुद्धी देवो. मी तुमच्यासाठी असेच किंवा त्याहूनही वाईट गोष्टी लिहू शकतो, पण मी लिहिणार नाही. कारण त्यामुळे फक्त नकारात्मकता वाढेल जी आपल्याला कुठेही घेऊन जाणार नाही!' राहुलने विराटचा भाऊ विकासला उद्देशून पुढे लिहिले की, 'विकास कोहली भाई, तुम्ही मला जे काही म्हटले त्यावरुन मला वाईट वाटत नाही, कारण मला माहितेय तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात आणि मॅन्चेस्टर किंवा ओव्हल स्टेडियमच्या बाहेर झालेली आपली भेट आणि तुम्ही माझ्या गाण्याबद्दल मला सांगितलेल्या चांगल्या गोष्टी मला आठवत आहेत.'from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CKDIRkQ
No comments:
Post a Comment