Breaking

Saturday, May 31, 2025

मुंबई इंडियन्सचा दोन तासांतच होऊ शकतो मोठा गेम, आयपीएलचा नवीन नियम आहे तरी काय पाहा... https://ift.tt/1RODJyb

मुलानपूर : मुंबई इंडियन्सचा संघ आता आयपीएलच्या सामन्यात पोहोचला आहे खरा, पण आयपीएलच्या एका नियमामुळे त्यांना आता मोठा धक्का बसू शकतो, असे समोर आले आहे. कारण हा सामना न खेळताही त्यांना स्पर्धेबाहेर जावे लागू शकते, असे आता म्हटले जात आहे. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर होता, याचा फटका त्यांना क्वालिफायर २ सामन्यात कसा काय बसू शकतो, हे आता समोर आले आहे.मुंबई आणि गुजरात यांच्या एलिमिनेटरचा सामना झाला. हा सामना पॉइंट्स टेबलमधील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांत होत असतो. त्यामुळे या दोन संघांचा सामना झाला. मुंबईच्या संघाने २२८ धावांचा डोंगर रचला. त्यानंतर मुंबईच्या संघाने अखेरच्या षटकात २० धावांनी हा सामना जिंकला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ क्वालिफायर २ सामन्यात पोहोचला. या सामन्यात आता मुंबईचा सामना पंजाब किंग्सबरोबर होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल, त्यांना आयपीएलच्या फायनलमध्ये एंट्री करता येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. पण आयपीएलचा एक नियम आता असा समोर आला आहे की, मुंबई इंडियन्सचा सामना न खेळताही मोठा गेम होऊ शकतो, असे आता समोर येत आहे.मुंबई आणि पंजाब यांच्यातील क्वालिफायर २ हा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी आता अहमदाबाद येथे पावसाला सुरुवात झाली आहे. पण पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होऊ शकते, हे समीकरण आता समोर आले आहे. जर दोन्ही संघांचा पाच षटकांचा सामना झाला तर निकाल लावला जाऊ शकतो. पण जर दोन्ही संघांचे पाच षटके होऊ शकले नाहीत, तर बीसीसीआयने या महत्वाच्या सामन्यासाठी एक नवीन नियम आणला आहे. त्यानुसार दोन तास अतिरीक्त वाट पाहिली जाऊ शकते. पण दोन तासांतही सामना झाला नाही तर काय होणार, हेदेखील आता समोर आले आहे. जर सामना होऊच शकला नाही, तर मुंबईला मोठा धक्का बसू शकतो. कारण सामना पावसामुळे रद्द झाला तर पॉइंट्स टेबलमधील अव्वल संघ फायनलमध्ये जाऊ शकतो. त्यानुसार पंजाबचा संघ पहिल्या स्थानावर होता, तर मुंबईचा संघ हा चौथ्या स्थानावर होता. त्यानुसार मुंबईचा संघ स्पर्धेबाहेर जाईल आणि पंजाबचा संघ हा फायनलमध्ये पोहोचू शकतो.क्वालिफायर २ सामन्यासाठी आता आयपीएलचा नवीन नियम समोर आला आहे. पण तरीही मुंबई इंडियन्सला कसा धक्का बसू शकतो, हे आता समोर आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/24mZJOY

No comments:

Post a Comment