Breaking

Friday, May 30, 2025

मुंबई इंडियन्सचा नाद करायचा नाय, गुजरातवर मोठा विजय साकारत फायनलच्या दिशेने मोठं पाऊल https://ift.tt/k7lCgOL

मुलानपूर: करो या मरो सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली आणि फायनलच्या दिशेने ठोस पाऊल टाकलं आहे. मुंबई इंडियन्सने अखेरच्या षटकार गुजरात टायटन्सवर Eliminator च्या सामन्यात २० धावांनी मात केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा नाद करायचा नाही, हे त्या संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. रोहित शर्माने धडाकेबाज ८१ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला २२८ धावांचा डोंगर उभारता आला. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिल तर लवकर बाद झाला. पण साई सुदर्शन हा मुंबईच्या विजयाच्या मार्गात मोठा अडसर ठरला होता. साई सुदर्शनने अर्धशतक झळकावले आणि तो संघाला विजयाच्या दिशेने घेऊ जात होता. साईला यावेळी वॉशिंग्टन सुंदर चांगली साथ देत होता. पण या दोघांना मुंबईने आपल्या जाळ्यात ओढत बाद केले आणि सामना फिरवला. मुंबईच्या संघाने दमदार फलंदाजी तर केली, पण अचूक गोलंदाजी करत त्यांना या सामन्याच विजय साकारला. रोहित शर्मा जेव्हा खेळतो तेव्हा तो धावांचे तुफान आणतो आणि हीच गोष्ट या सामन्यातही पाहायला मिळाली. रोहित शर्माला दोनदाव जीवदान देत यावेळी गुजरातच्या संघाने मोठ्या चुका केला. रोहित तर दोन धावांवर असताना त्याला बाद करण्याची संधी गुजरातकडे होती, पण त्यावेळी गेराल्ड कॉत्झेने त्याचा झेल सोडला. त्यानंतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कुशल मेंडिसने त्याला जीवदान दिले. त्यावेळी रोहित शर्मा हा १२ धावांवर होता. रोहित शर्माने या दोन जीवदानांचा चांगलाच फायदा उचलला. रोहितने त्यानंतर फटक्यांची आतिषबाजी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. पण रोहितला शतक झळकावता आले नाही, तो ८१ धावांवर बाद झाला. पण अखेरच्या षटकांच मुंबईने दमदार फलंदाजी करत २२८ धावा केल्या.मुंबईच्या २२९ धावांचा पाठलाग करण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरला, पण पहिल्याच षटकात त्यांना शुभमन गिलच्या रुपात मोठा धक्का बसला. त्यानंतर कुशल मेंडिसली लवकर बाद झाला. पण त्यानंतर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या डावखुऱ्या जोडीने धमाकेदार फटकेबाजी केली. या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे ही जोडी आता गुजरातला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण मुंबईने सुंदरला ४८ आणि साईला ८० धावांवर बाद केले आणि हा सामना गुजरातच्या हातून निसटला. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी यावेळी अप्रतिम मारा केला. एलिमिनेटरचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. कारण हा सामना जो गमावणार होता, त्याचे आव्हान संपुष्टात येणार होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/94nsQdf

No comments:

Post a Comment