Breaking

Saturday, May 10, 2025

युद्धविरामानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; जम्मूपासून राजस्थानपर्यंत ड्रोन हल्ले, भारताकडून प्रहार सुरु https://ift.tt/DOHVjih

नवी दिल्ली : युद्धविरामानंतरही पाकिस्तानच्या कुरापती काही थांबण्याचे नाव घेत नाही. युद्धविरामानंतर अवघ्या ४ तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे आणि आपला खरे रंग दाखवले आहेत. जम्मू-काश्मीरपासून राजस्थानपर्यंत पाकिस्तानने ड्रोन हल्ले आणि गोळीबार सुरु केला. खरंतर पाकिस्ताननेच भारताकडे युद्धबंदीची विनंती केली होती. पण आता त्याच पाकिस्तानने सीमावर्ती भागात हल्ले सुरु केले आहेत. तेव्हाच भारत मात्र या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत.युद्धविरामानंतर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये रात्रीची शांतता होती. मात्र पाकिस्तानी ड्रोनच्या मोठ्या स्फोटांनी ती भंगली आहे. भारतीय हवाई संरक्षण दलाने हे ड्रोन हल्ले उधळून लावले आहेत, परंतु शहरात ब्लॅकआउटची परिस्थिती कायम आहे. यावर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, 'युद्धविरामाचे काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले.' उधमपूरमध्येही असेच एक दृश्य पाहायला मिळाले आहे, जिथे भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडले आहेत.पाकिस्तानचे हे कृत्य फक्त जम्मू आणि काश्मीरपुरते मर्यादित नाहीत. तर पंजाबमधील पठाणकोट आणि फिरोजपूरमध्येही ड्रोन दिसल्याने पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला आहे. राजस्थानातील जैसलमेर आणि बारमेर देखील पूर्णपणे अंधारात बुडाले होते. हे स्पष्ट आहे की, पाकिस्तानचा कट सीमेपलीकडून भारताच्या प्रत्येक कोपऱ्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.गुजरातमधील कच्छमध्येही पाकिस्तानी ड्रोन नजरेस पडले आहेत. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी एक्स हँडलवर पोस्ट करत म्हटले की, 'कच्छ जिल्ह्यात अनेक ड्रोन दिसले आहेत. आता संपूर्ण ब्लॅकआउट लागू केले जाईल. कृपया सुरक्षित रहा, घाबरू नका.'भारतीय लष्कर आणि हवाई संरक्षण दलांनी पाकिस्तानला प्रत्येक आघाडीवर चोख प्रत्युत्त दिले आहे. श्रीनगर आणि उधमपूरमध्ये ड्रोन पाडण्यात आले आणि सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला पाकिस्तानला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पण अजूनही असा प्रश्न कायम आहे की, पाकिस्तान कधीतरी आपल्या कारवाया थांबवेल का, की भारताला अधिक कठोर पावले उचलावी लागतील?


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/UfkE0dI

No comments:

Post a Comment