Breaking

Saturday, May 10, 2025

वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानची लायकी दाखवून दिली, युद्धविरामानंतर वीरुचं ट्विट जगभरात व्हायरल https://ift.tt/tnmy0h7

नवी दिल्ली : वीरेंद्र सेहवागचे युद्धविरामानंतरचे एक ट्विट जगभरात व्हायरल झाले आहे. युद्धविरामानंतर पाकिस्तानने भारतावर पुन्हा हल्ला केल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर वीरुने एक जबरदस्त ट्विट केले आहे. या एका ट्विटने सेहवागने पाकिस्तानची जगासमोर लाज काढली आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरु असताना अमेरिकेने दोन्ही देशांना युद्धविराम करण्यास सांगितले होते. दोन्ही देशांनी अमेरिकेचे म्हणणे ऐकत युद्धविराम घेतला होता. त्यानंतर हे युद्ध संपलं, असं बऱ्याच जणांना वाटत होतं. पण त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि शस्त्रसंधीचं उंल्लघन केलं. त्यामुळे पाकिस्तानला आता भारत जोरदार प्रत्यूत्तर देत असल्याचे म्हटले जात आहे. पण वीरेंद्र सेहवागने हे एका वाक्याचे ट्विट पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून देण्यासाठी चोख असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवागने फक्त एकाच वाक्यात पोस्ट करत त्यांची लाज काढली आहे. सेहवागने यावेळी एक हिंदी म्हणीचा चपखल वापर यावेळी केला आहे. सेहवागने वापरलेली ही म्हण पाकिस्तानला एकदम चपखल बसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. वीरेंद्र सेहवागने यावेळी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, " कुत्र्याची शेपूट, वाकडी ती वाकडीच राहणार... " पाकिस्तानला कितीही संधी दिली तरी तो सुधारणार नाही, असे सेहवागला यावेळी म्हणायचे आहे. सेहवागची ही पोस्ट बऱ्याच जणांना आवडली आहे आणि ती सध्याच्या घडीला जोरदार व्हायरल होत असल्याचे आता समोर आले आहे. सेहवागने एका वाक्यात आता पाकिस्तानली बोलतीच बंद केल्याचे पाहायला मिळाले आहे.पाकिस्तानने गुरुवारी भारतावर हल्ला केला आणि त्यामुळे आयपीएलचा सामना रद्द करावा लागला. त्यानंतर आयपीएल स्थगित करावी लागली आणि आता आयपीएल पुढे कधी सुरु होईल, हे सांगता येत नव्हते. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आयपीएल लवकर सुरु होईल, असे वाटत होते. पण पाकिस्तानने पुन्हा एकदा शनिवारी भारतावर हल्ला केल्याचे म्हटले गेले आणि आता आयपीएल पुन्हा लांबणीवर जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/SMgsLOl

No comments:

Post a Comment