मुंबई- बॉलिवूडपासून ते दक्षिणेपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचा मृत्यू किंवा हत्येचे गूढ अद्यापही उलगडले नाही. इंडस्ट्रीतल्या काही जणांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला होता. जेव्हा अभिनेत्री प्रिया राजवंशची हत्या झाली तेव्हा देव आनंद यांच्या भावांच्या मुलांवर दोषारोप ठेवण्यात आले, तर लैला खानची हत्या तिच्याच सावत्र वडिलांनी केल्याचे म्हटले गेले. दक्षिणेतही अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या मृत्यूचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही. अशाच एका दक्षिणेतील अभिनेत्रीच्या मृत्यूची अंगकावर काटा आणणारी कथा जाणून घेऊ. या अभिनेत्रीचा मृत्यू अपघाती होता की कोणीतरी तिची हत्या केली, हे प्रकरण कधीच उलगडले नाही आणि मग केस बंद झाली. ही अभिनेत्री म्हणजे , ती एक सौंदर्याची खाण होती. बिदुशीने कमल हासनसह अनेक मोठ्या स्टार्ससोबत चित्रपटांमध्ये काम केले होते. पण २२ ऑक्टोबर २०१२ हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला. जेव्हा तिच्या नवऱ्याने घराचा दरवाजा उघडला तेव्हा बिदुशीचा रक्ताने माखलेला मृतदेह त्याच्या समोर पडला होता. चेहऱ्यावर आणि मानेवर खोल जखमा होत्या. तिथले दृश्य खुनाकडे इशारा करत होते.बिदुशी दास बर्डे ही एक प्रसिद्ध दक्षिण अभिनेत्री होती. ओडिशामध्ये जन्मलेल्या बिदुषी दास बर्डे हिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर २००६ मध्ये मिस चेन्नई सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. बिदुशीने दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करायला सुरुवात केली. तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. त्या काळात तिची भेट सॉफ्टवेअर इंजिनियर केदारशी झाली. भेटीगाठी वाढत गेल्या आणि मग त्यांच्यात प्रेमाची सुरुवात झाली. अचानक सापडला मृतदेह यानंतर केदार आणि बिदुशीचे लग्न झाले ते मुंबईत राहायला आले. इथे बिदुशीने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला चित्रपट मिळाले नाहीत. यामुळे बिदुशी करियरसाठी काळजीत होती. मग २२ ऑक्टोबर २०१२ रोजी ती तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. त्या दिवशी बिदुशीचा नवरा केदार सकाळी लवकर ऑफिसला गेला होता. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्याने बिदुशीला मेसेज केला पण त्याला काहीच उत्तर मिळाले नाही. असे म्हटले जाते की जेव्हा केदार संध्याकाळी घरी पोहोचला, बेल वाजवली तेव्हा बिदुशीने दार उघडले नाही. पतीने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला - समोर रक्ताने माखलेला मृतदेह तो बराच वेळ बेल वाजवत होता. केदारकडे घराची डुप्लिकेट चावी होती. जेव्हा त्याने दार उघडले तेव्हा त्याला त्याची पत्नी बिदुशीचा मृतदेह रक्ताने माखलेला दिसला. जवळच एक कपाट होते ज्याची काच तुटलेली होती आणि त्याचे तुकडे बिदुशीच्या मानेवर, गालावर आणि हातावर अडकले होते. सुरुवातीला पोलिसांना वाटले की हा दरोडा असू शकतो, परंतु पतीच्या जबाबानंतर पोलिसांनी हत्येच्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला. पतीला हत्येचा संशय, चौकशीदरम्यान सांगितले हे सर्व घराच्या दुसऱ्या चाव्या केदारकडेच असल्याने तसेच बिदुशीचा फोन तपासल्यावर बहुतेक कॉल आणि मेसेजेस त्याचेच होते, त्यामुळे हत्येचा संशय केदारवरच आला. केदारने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे नाकारले पण चौकशीदरम्यान त्याने सांगितले की त्याचे आणि बिदुशीचे भांडण झाले होते. त्याची आर्थिक परिस्थिती वाईट होती. केदारच्या मते, त्याचा पगार कमी होता, त्यातील अर्धा भाग भाडे भरण्यात खर्च होत होता आणि बिदुशीलाही चित्रपट मिळत नव्हते. त्यात तिला मधुमेहही होता. केदारच्या म्हणण्यानुसार, बिदुशीचा ब्लडप्रेशर कमी होता, ज्यामुळे ती अनेकदा बेशुद्ध व्हायची आणि चालताना पडायची. एक दिवस आधी पतीशी भांडण झाले होते, मृत्यूच्या दिवशी ८० फोन केदारने असेही सांगितले होते की बिदुशीच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांच्यात भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी केदार ऑफिसला गेला आणि बिदुशीला फोन करून मेसेज केला. पण उत्तर मिळाले नाही. पोलिसांनी तपास केला तेव्हा असे आढळून आले की ज्या दिवशी बिदुशीचा मृत्यू झाला त्या दिवशी तिला ८० फोन आले होते, त्यापैकी बहुतेक फोन तिच्या पती केदार आणि वडिलांचे होते. पोलिसांनी प्रत्येक दृष्टीने तपास सुरू ठेवला, पण त्यांना कोणताही पुरावा सापडला नाही. शेजारच्या मोलकरणीने केला धक्कादायक खुलासा पण एका प्रत्यक्षदर्शीने त्यावेळी असा दावा केला होता की बिदुशीच्या मृत्यूच्या दिवशी तिने तिच्या घरातून कोणालातरी बाहेर पडताना पाहिले होते. २०१२ मध्ये पीटीआयच्या वृत्तानुसार, शेजारी काम करणाऱ्या एका मोलकरणीने सांगितले की, बिदुशीच्या मृत्यूच्या दिवशी सकाळी ९ वाजता तिने एका पुरूषाला तिच्या अपार्टमेंटमधून बाहेर येताना पाहिले होते. त्याने पांढरा शर्ट घातला होता. घराचा मुख्य दरवाजा थोडासा उघडा होता. मोलकरणीच्या या दाव्याने पोलिसांनाही आश्चर्य वाटले. त्यानंतर त्यांनी पांढऱ्या शर्टातील माणसाचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्या दिवशी त्या परिसरात आणखी कोण कोण दिसले होते याची चौकशीही वॉचमनला केली. पोलिसांनी सांगितले होते- मृतदेहाची स्थिती पाहून असे वाटत होते की बिदुशीसोबत कोणीतरी होते. तेव्हा पोलिसांनी सांगितले होते की, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये बिदुशीच्या शरीरावर गंभीर जखमां दिसून आल्या. त्या खोल जखमा होत्या आणि परिस्थिती पाहून असे वाटते की त्यावेळी घरात बिदुशीशिवाय दुसरे कोणीतरी होते. पण घरात जबरदस्तीने घुसल्याचा कोणताही पुरावा नव्हता किंवा कोणतीही वस्तू हरवली नव्हती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत बिदुशी ही घटना घडवणाऱ्या व्यक्तीला ओळखत होती हे निश्चित आहे. अपघाती मृत्यूचा खटला दाखल करून केस बंद ज्या रुग्णालयात बिदुशी दास बर्डेचे शवविच्छेदन करण्यात आले त्या रुग्णालयातील डॉक्टरांनीही बिदुशी यांचा मृत्यू अपघाती असल्याचे सांगितले. तिची हत्या झालेली नाही. त्यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आणि फाईल बंद केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/FSkpmfM
No comments:
Post a Comment