Breaking

Thursday, May 22, 2025

राज्यातील महाविद्यालयांना मोठा दिलासा! ‘नॅक’ मूल्यांकन, पुर्नमूल्यांकनास सहा महिन्यांची मुदतवाढ https://ift.tt/DRXw67N

National Assessment and Accreditation Council in Maharashtra Colleges : उच्च शिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांना ‘नॅक’ मूल्यांकन, पुर्नमूल्यांकन करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. विभागाच्या गुरुवार २२ मेच्या निर्णयाने ‘नॅक’ मूल्यांकन न करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकताच नॅक मूल्यांकनात टाळाटाळ करणाऱ्या २३३ महाविद्यालयांचे २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षाचे प्रवेश शुन्य केले होते.राज्यातील महाविद्यालयांना ‘नॅक’ मुल्यांकन करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार ‘नॅक’ न केलेल्या महाविद्यातील प्रवेश रोखण्याचे आदेशही उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांनी ‘नॅक’ मूल्यांकन, पुर्नमूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तर तब्बल २३३ महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याचा निर्णय घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांवर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. विद्यापीठाशी संलग्न ४८४ पैकी केवळ २५१ महाविद्यालयांमध्येच प्रथम वर्षाचे प्रवेश होणार होते. मात्र, आता या निर्णयाने २३३ महाविद्यालयांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. निर्णयाने राज्यातील विविध विद्यापीठांना महाविद्यालयांवर कारवाई करण्यासाठी उचलेले पाऊल मागे घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.विभागाने काय म्हटले?राज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत २१ मे रोजी बैठक झाली. या बैठकीत नॅक, बंगलोर यांचे मुल्यांकन व पुर्नमुल्यांकनासाठी संस्था नोंदणी पोर्टल कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितास्तव नॅक मुल्यांकन करण्यास महाविद्यालयांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे निर्देश दिल्याचेही पत्रात म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/C4dtqPG

No comments:

Post a Comment