Breaking

Wednesday, May 21, 2025

Vaishnavi Hagawane मृत्यू प्रकरणात काय-काय घडलं? पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नक्की काय? पोलिसांकडून A टू Z माहिती https://ift.tt/puvE1K2

अभिजीत दराडे, पुणे : मृत्यू प्रकरणात काय-काय घडलं? शवविच्छेदन अहवालात नक्की काय आहे? याबाबत पुणे पोलिसांनी A टू Z माहिती दिली आहे. पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी याबाबत आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली. " यांना शोधायला 3 पथक तयार करण्यात आले आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल", अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली. तसेच "आमच्यावर कोणताही दबाव नाही. ना कोणाचा आम्हाला फोन आलाय, एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे. त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत", असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आरोपींना कोर्टात हजर करून पोलीस रिमांड वाढवून घेणार, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली."शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स काढून ठेवलेले आहेत. ते पुढील तपासासाठी आम्ही पाठवणार आहोत. त्यामध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं एक कारण दिलेलं आहे आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेटमध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यानुसार आम्ही कलम 304 हे वाढवले आहे. त्यासोबतच 80(2), 108 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये पती, सासू आणि नणंद यांना 21 तारखेपर्यंत पोलीस रिमांड आहे", अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली."उर्वरित दोन आरोपी म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे तीन-तीन पथक बनवले आहेत. त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास सुरू आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल", अशी माहिती पोलिसांनी दिली. "या गुन्ह्याचा जो सिक्वेन्स आहे, जे पुरावे आहेत, त्यानुसार या घटनेचा जो लेखाजोखा आहे, केल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतच्या दोन तासाचे अनेक पुरावे आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे उद्या आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचं पोलीस रिमांड वाढवून घेणार आहोत. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या घरी असणारे पाच ते सहा सीसीटीव्ही कॅमेरे परिस्थितीजन्य पुरावे आजूबाजूला असणारे साक्षीदार यांना जमा करण्यास आम्हाला वेळ मिळाला आहे", असं सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितलं. "आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही आम्हाला कुणाचाही फोन आला नाही कायदेशीर पद्धतीने आमचा तपास सुरू आहे. ही घटना जी आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत असून अगदी बारकाईने सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे", अशी माहिती त्यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/jcAdFrf

No comments:

Post a Comment