अहमदाबाद : अतिशहाणा त्याचा बैल रिकामा... अशी एक मराठीत म्हण आहे आणि ती मोहम्मद सिराजच्या बाबतीत तंतोतंत योग्य असल्याची पाहायला मिळाली. कारण सिराज अतिशहाणपणा करत भर सामन्यात निकोलस पुरला भिडायला गेला होता. पण पुरनने त्याची एका चेंडूतच बोलती बंद केल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ आता जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे.ही गोष्ट घडली ती १६ व्या षटकात. त्यावेळी निकोलस पुरन हा दमदार फलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूचा सामना करण्यासाठी पुरन तयार होता. पण सिराजने हा चेंडू बाऊन्सर टाकला. या बाऊन्सरवर पुरनला फटका मारता आला नाही. त्यामुळे हा चेंंडू निर्धाव गेला. त्यावेळी मोहम्मद सिराज अतिशहाणपणा करायला गेला आणि त्याने जाऊन पुरनला खुन्नस दिली. पुरन हा तसा शांत खेळाडू आहे. त्यामुळे पुरनने यावेळी आपले तोंड उघडले नाही, पण सिराजची मात्र बोलती कशी बंद करायची, याचा प्लॅन त्याच्या डोक्यात चांगलाच शिजलेला होता. कारण त्यानंतर एकाच चेंडूत पुरनने सिराजची बोलती बंद केल्याचे पाहायला मिळाले.सिराजने हा चेंडू स्टम्पच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला. पण पुरन यावेळी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यापूर्वीच्या चेंडूवर सिराजने त्याला खुन्नस दिली होती. पुरनने या संधीचा चांगलाच फायदा उचलला. सिराजने अप्रतिम टायमिंग साधले आणि भन्नाट षटकार लगावला. पुरनचा हा षटका साधासुधा नव्हता, तर त्याने प्रेक्षकांमध्ये हा चेंडू भिरकावला आणि सिराजची बोलतीच यावेळी बंद केल्याचे पाहायला मिळाले. पुरन यावेळी गालातल्या गालात हसत होता, पण त्याने सिराजला खुन्नस दिली नाही किंवा तो त्याला काहीच बोलला नाही. क्रिकेटच्या मैदानात काहीही न बोलता बॅटने कसे उत्तर देता येते, हे पुरनच्या माध्यमातून चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाले.मोहम्मद सिराज या सामन्या अतिशहाणपणा करायला गेला आणि तो त्याला चांगलाच नडला. कारण यावेळी निकोलस पुरनने काहीही न बोलता फक्त एका फटक्याच्या जोरावर त्याची पूर्ण बोलतीच बंद करून टाकली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gKGNYnf
No comments:
Post a Comment