लखनौ: आरसीबीला सनरायझर्स हैदराबादने पराभूत केले आणि त्यानंतर त्यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. हा सामना संपला आणि त्यानंतर आरसीबीला अजून एक मोठा धक्का बसल्याचे समोर आले. आरसीबीला हैदराबादकडून ४२ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि सामना संपल्यावर त्यांना अजून एक मोठा धक्का बसला.आरसीबीसाठी हा सामना महत्वाचा असला तरी हैदराबादच्या फलंदाजांनी त्यांच्या नाकी नऊ आणले होते. हैदराबादचे सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी धडाकेबाज सलामी दिली होती. हे दोघे बाद झाले आणि मैदानात इशान किशन नावाचे वादळ मैदानात घोंघावले. इशान किशनने ४८ चेंडूंत ८ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ९४ धावांची तुफानी खेळी साकारली. त्यामुळेच हैदराबादच्या संघाला २३१ धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाने धमाकेदार सुरुवात करत ८० धावांची सलामी दिली. विराट कोहली ४३ धावांवर बाद झाला तरी फिल सॉल्ट दमदार फटकेबाजी करत होता. सॉल्टने ३२ चेंडूंत ६२ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर आरसीबीचा संघ अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले. कारण रजत पाटीदारही १८ धावांवर धावचीत झाला होता. त्यानंतर हंगामी कर्णधार जितेश शर्माही बाद झाला आणि आरसीबी पराभूत होणार हे स्पष्ट झाले आहे. आरसीबीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला असला तरी त्यांच्यासाठी त्यापूर्वीचे सामनेही महत्वाचे आहेत. या सामन्यापूर्वी आरसीबीच्या संघाने १२ सामने खेळले होते. या १२ सामन्यांत त्यांनी आठ विजय मिळवले होते, तर तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. आरसीबीचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आरसीबीच्या संघाचे १७ गुण झाले होते. या १७ गुणांसह आरसीबीचा संघ हा दुसऱ्या स्थानावर विराजमान होता. पण या पराभवानंतर आता आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला होता. पण या पराभवामुळे त्यांना आता त्यांना पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान गमवावे लागले आहे. आरसीबीचा आता पॉइंट्स टेबलमध्ये घसरण झाली आहे. आरसीबीची आता तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे आणि पंजाब दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे आरसीबीच्या संघासाठी हा अजून एक मोठा धक्का असेल. आरसीबीच्या संघाने प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. पण त्यानंतर या सामन्यात त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर आता आरसीबीच्या संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण हा सामना संपला आणि त्यानंतर आरसीबीला कोणता मोठा धक्का बसला आहे, हे आता समोर आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/e5Kf3za
No comments:
Post a Comment