Breaking

Thursday, May 1, 2025

हार्दिकला झालंय तरी काय, १०० धावांनी विजय मिळवूनही नाराज, सामना संपल्यावर म्हणाला की... https://ift.tt/VgYFo7J

जयपूर : मुंबई इंडियन्सने तब्बल १०० धावांनी दमदार विजय साकारला. मुंबईचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. पण या विजयानंतरही मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या हा नाराज होता. हार्दिकने आपली नाराजी, सामान संपल्यावर व्यक्त केली.मुंबई इंडियन्सने राजस्थानच्या या सामन्यात दमदार कामगिरी केली. कारण या सामन्यात मुंबईने फक्त विजय मिळवला नाही, तर त्यांनी मोठा विजय साकारला. मुंबईला तब्बल १०० धावांनी विजय मिळवता आला. मुंबईला या गोष्टीचा फायदा पॉइंट्स टेबलमध्ये झाला. कारण मुंबई आणि आरसीबी यांचे समान १४ गुण आहेत. पण तरीही मुंबईचा संघ हा अव्वल स्थानावर पोहोचला आहे तो चांगल्या रन रेटमुळे. मुंबईचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आणि त्यानंतरही हार्दिक नाराज असल्याचे पाहायला मिळाले. पण हार्दिक या विजयानंतर नाराज का होता, हे त्याने सामना संपल्यावर सांगितले.हार्दिक पंड्या म्हणाला की, " आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी केली, त्यामुळे आमच्यासाठी हा एक परफेक्ट विजय ठरला. रोहित शर्मा आणि रायन यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर मी आणि सूर्याने चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे या सामन्यात आम्ही २०० धावांचा पल्ला गाठू शकलो. पण तरीही मला एका गोष्टीची खंत वाटते. आम्ही या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली, ते पाहता अजून १५ जास्त धावा आम्हाला करायला हव्या होत्या, पण त्याकाही आम्हाला या सामन्यात करता आल्या नाहीत. गोलंदाजी तर आम्ही कमालच केली. एक संघ म्हणून आता आमची कामगिरी आता बहरत चालली आहे. त्यामुळे कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे असेल. " मुंबईने १०० धावांनी विजय साकारला. तरीही आम्हाला अजून १५ धावा करायला हव्या होत्या, ही नाराजी हार्दिकने व्यक्त केली आहे, पण दुसरीकडे संघाने १०० धावांनी विजय साकारला, हे मात्र तो विसरला की काय, अशी टीका आता त्याच्यावर होते आहे. मुंबईच्या संघाने मोठा विजय साकारला, पण त्यानंतरही हार्दिक पंड्या हा नाराज दिसला. हार्दिक विजयानंतरही नाराज का होता, हे आता समोर आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RxpwAZ5

No comments:

Post a Comment