Breaking

Tuesday, May 13, 2025

गावोगावी 'डोनाल्ड यात्रा' काढा; भाजपने अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्याची राऊतांची टीका https://ift.tt/kBwfLRe

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भाजपने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करून तिरंग्याचा अपमान केला आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भाजपने तिरंगा यात्रा काढण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्पचा झेंडा हातात घेऊन गावोगावी ‘डोनाल्ड जत्रा’ भरवाव्यात, असा चिमटा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काढला. या यात्रेच्या निमित्ताने डोनाल्ड जत्रेला जाऊन आलो, असे भाजप कार्यकर्त्यांना म्हणता येईल, असा उपहास त्यांनी केला. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींसोबत शरद पवार जाणार नाहीत, असा दावाही राऊत यांनी केला.आगामी आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.१३) नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्र सोडले. ‘युद्ध का थांबवले असा सवाल उपस्थित करत, भारतीय सैन्याला चार दिवस भेटले असते तर ‘पीओकेच’ नव्हे, तर लाहोर आणि कराचीवरही ताबा घेतला असता. परंतु सरकारने कच खाल्ली आणि ट्रम्प यांच्या दबावापुढे माघार घेतली. मागताना ट्रम्प यांना भाजपने विचारले होते काय,’ असा सवालही राऊत यांनी केला. ‘शिवसेना ठाकरे गट उत्तर महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढणार आहे. तसेच गद्दारांचा समाचार घेणार आहे,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामंत-राज भेटीवरही टीकामनसे अध्यक्ष आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीवरही राऊत यांनी टीका केली. ‘त्यांची भेट होऊ द्या, त्यांना काम काय? त्यांच्या घरी खिचडी बनत नाही. शिवाजी पार्कला चांगले हॉटेल आहेत, तिथे उत्तम खिचडी मिळते. लोक तिथे सकाळी फिरायला जातात, तसे उदय सामंत येत असतील,’ असा टोला त्यांनी लगावला. ‘लोकशाहीत कोणी कोणाकडे जाण्यावर बंधन नाही. या छुप्या राजकारणातच त्यांचा पराभव दिसतो आहे. तुम्ही भाजप, अजित पवारांसोबत आहात इतर पक्षांसोबतही तुम्ही संधान जुळवत आहात. तुम्ही नक्की कोणासोबत आहात, यातूनच तुमचे अस्तित्व दिसते आहे, असे सांगत तुमच्या पक्षाची निशाणी खिचडी ठेवा,’ असा टोलाही राऊत यांनी लगावला. पवार महायुतीसोबत जाणार नाहीतशरद पवार महायुतीसोबत जाणार नाहीत. त्यांच्या एका मुलाखतीतील ओळीवरून तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठत आहात. आम्ही अनेक वर्षे पवारांसोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांची भूमिका आम्हाला ठाऊक आहे, असे राऊत म्हणाले. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींसोबत शरद पवार जाणार नाहीत. ज्या विचारांसाठी त्यांनी संघर्ष केला, विरोधी पक्षात राहिले आता ते महाराष्ट्रद्वेषी शक्तींसोबत जाणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/7IJP2Er

No comments:

Post a Comment