Breaking

Monday, May 12, 2025

IPLच्या नवीन वेळापत्रकात चार सामन्यांबाबत निर्णय का झाला नाही, जाणून घ्या खरं कारण... https://ift.tt/uZl5Ycx

नवी दिल्ली : आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार आता सर्व सामने कधी आणि कुठे होणार, हे समजले असे सर्वांना वाटले होते. पण या वेळापत्रकात चार सामने असे आहेत, जे कुठे होणार हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही.गुरुवारी पाकिस्तानने हल्ला केला आणि त्यानंतर पंजाब किंग्सचा धरमशाला येथील सामना थांबवण्यात आला होता. त्यानंतर आयपीएलच्या प्रशासकीय समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये आयपीएल ही एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार आता आयपीएलचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर आयपीएलती फायनल आता ३ जूनला होणार असल्याचे समोर आले आहे. पण या वेळापत्रकात चार सामने असे आहेत की, जे कुठे होणार हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. आयपीएलचे लीगचे १३ सामने आता कुठे आणि कधी होणार हे ठरवण्यात आले आहे. पण चार सामन्यांची तारीख ठरली असली तरी ते कुठे होणार, हे मात्र अद्याप ठरवण्यात आलेले नाही. आयपीएलमधील क्वालिफायर १ हा सामना २९ मे या दिवशी खेळवण्यात येणार आहे, पण हा सामना कुठे खेळवला जाणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यानंतर आयपीएलचा एलिमिनेटर हा सामना ३० मे या दिवशी खेळवण्यात येणार आहे, हा सामना देखील कुठे होणार, हे ठरवलेले नाही. आयपीएलमधील क्वालिफायर -२ हा सामना १ जून या दिवशी होणार आहे, पण तोदेखील कोणत्या शहरात होणार आहे, हे समजू शकलेले नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलचा अंतिम सामना किती तारखेला होणार हे जाहीर केले आहे, पण या सामन्याचे ठिकाण मात्र अजूनही बीसीसीआयने ठरवलेले नाही. त्यामुळे बाद फेरीतील चारही सामन्यांची ठिकाणे अद्याप ठरवण्यात आलेली नाहीत. लीगचे सामने झाल्यावर या मॅचेसच्या ठिकाणांची माहिती बीसीसीआय देणार असल्याचे आता समोर येत आहे कारण जे संघ प्ले ऑफमध्ये नसतील तिथे हे सामने खेळवले जातील.आयपीएलच्या लीग सामन्याची सर्व माहिती देण्यात आली आहे. पण आयपीएलमधील प्ले ऑफच्या सामन्यांची ठिकाणं मात्र आतापर्यंत बीसीसीआयने जाहीर केलेली नाहीत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/kJgRaEd

No comments:

Post a Comment