मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ही आयपीएल टीम पंजाब किंग्जची मालकीण देखील आहे. आयपीएल २०२५ दरम्यान ती नेहमीच स्टेडियममध्ये दिसते. त्याचबरोबर, अभिनेत्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा PZchat करते. अशातच आता या सेशनदरम्यान, एका चाहत्याने तिला एक प्रश्न विचारला ज्यावर प्रीती संतापली असून अभिनेत्रीने त्याला चांगलंच सुनावलं आहे. पीझेडचॅट सेशनदरम्यान, एका चाहत्याने प्रीती झिंटाला विचारलं, 'मॅडम, मॅक्सवेलचं तुमच्याशी लग्न झालं नव्हतं, म्हणूनच तो तुमच्या संघात चांगला खेळला नाही?' चाहत्याच्या या प्रश्नावर संतापली. उत्तरात तिनं लिहिलं, 'तुम्ही हा प्रश्न सर्व पुरुष संघ मालकांना विचाराल का, की हा भेदभाव फक्त महिलांसाठी आहे?' मी क्रिकेटमध्ये येईपर्यंत मला कधीच माहित नव्हतं की महिलांसाठी कॉर्पोरेट सेटअपमध्ये टिकून राहणं किती कठीण आहे.'प्रीती झिंटाने पुढे लिहिलं, 'मला खात्री आहे की तुम्ही हा प्रश्न मस्करीत विचारला असेल, पण मला आशा आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नाकडे खरोखर पहाल आणि तुम्ही काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहात ते समजू शकाल. कारण, जर तुम्हाला खरोखरच समजलं असेल की तुम्ही काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहात, तर ते चांगलं नाही! मला वाटतं की, मी गेल्या १८ वर्षात माझी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, म्हणून कृपया मला माझा योग्य आदर द्या आणि भेदभाव थांबवा. धन्यवाद.'प्रीती झिंटाने ज्या पद्धतीने उत्तर दिलं त्यावर इतर सोशल मीडिया युजर कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलं, 'प्रीती मॅडम, या प्रतिसादासाठी तुम्हाला सलाम. पंजाब किंग्जसोबत तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे आणि किमान कोणीतरी तुम्हाला तो आदर देऊ शकेल ज्यासाठी तुम्ही पात्र आहात. लोक अशा घाणेरड्या कमेंट्स करत राहतात, हे आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणं आहे. खंबीर राहा आणि पुढे जात राहा मॅडम.' दुसऱ्या युजरने कमेंट केली की, 'मॅडम अशा लोकांकडे दुर्लक्ष करा, ते त्यांच्या आयुष्यात काहीही करू शकत नाहीत.' दरम्यान, प्रीती झिंटाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर बाबतीत बोलायचे झाले तर, ती आता 'लाहोर १९४७' मध्ये दिसणार असून या तिच्यासोबत सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/e0X8ZEh
No comments:
Post a Comment