मुंबई- ९० च्या दशकापासून अगणित लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. माधुरी दीक्षितचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबईत झाला. मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या माधुरीला दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. हा चित्रपट जरी फ्लॉप झाला असला तरी माधुरीच्या अभिनयाचे मात्र कौतुक झाले. माधुरी दीक्षितने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पद्मश्री सारख्या पुरस्काराने सन्मानित झालेल्या माधुरीने आणखीनही डझनभर पुरस्कार जिंकले आहेत. एक काळ असा होता जेव्हा तिला चित्रपटात काम करण्यासाठी महिला कलाकार म्हणून सर्वाधिक पैसे मिळत असत. आजही तिचे चाहते तिच्या 'मोहिनी' हास्य आणि मोहक स्टाइलचे कौतुक करताना थकत नाहीत. माधुरीच्या वाढदिवसानिमित्त पाकिस्तानने एकदा काश्मीरच्या बदल्यात माधुरी दीक्षितची मागणी कशी केली होती तो किस्सा जाणून घेऊ. लोकप्रियता केवळ भारतीय चाहत्यांमध्येच नव्हती तर पाकिस्तानातही तिचे भरपूर चाहते होते. तिच्या एका हास्यासाठी लाखो लोक आपले प्राण देण्यासही तयार होते. पाकिस्तानमधली मुले माधुरीच्या चित्रपटांच्या पोस्टर्सने आपली घरे सजवत असत. प्रत्येकाचे फक्त एकच स्वप्न होते - एकदा तरी माधुरीला भेटायचे तिला जवळून पाहायचे. ही घटना कारगिल युद्धाच्या काळातील असल्याचे म्हटले जाते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जेव्हा सीमेवर युद्ध सुरू झाले तेव्हा पाकिस्तानी लोकांनी म्हटले होते की जर त्यांनी त्यांना दिली तर ते काश्मीर सोडून जातील. माधुरीची क्रेझ आजपर्यंत कोणत्याही नायिकेमध्ये दिसली नाही. तेजाब, राम लखन, परिंदा, साजन, खलनायक, दिल, बेटा, हम आपके है कौन, दिल तो पागल है, लज्जा, पुकार, देवदास यांसारख्या चित्रपटांमध्ये माधुरीच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. आमिरसोबत दिल, सलमानसोबत हम आपके है कौन आणि शाहरुखसोबत दिल तो पागल है असे यशस्वी चित्रपट देणाऱ्या माधुरीने तिच्या काळातील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. माधुरीच्या अफेअरचे किस्सेही खूप गाजले. एक काळ असा होता जेव्हा संजय दत्तसोबतच्या तिच्या लग्नाच्या बातम्या जोर घेऊ लागलेल्या. 'थानेदार' चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम फुलले असे म्हटले जाते. पण १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटात संजय दत्तचे नाव आल्यावर माधुरीने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fwjETqY
No comments:
Post a Comment