Breaking

Wednesday, May 14, 2025

पाकिस्तानची जगासमोर लाज गेली, T20 लीग सुरु करणार, पण या एका गोष्टीमुळे नामुष्कीची वेळ https://ift.tt/WdYCzyQ

नवी दिल्ली : पाकिस्तानची आता पुन्हा एकदा जगासमोर लाज गेल्याचे समोर आले आहे. गेले काही दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती, पण आता आयपीएल १७ मेपासून सुरु होणार आहे. दुसरीकडे पाकिस्तान सुपर लीगही स्थगित करण्यात आली होती, पण आता ही लीगही सुरु करण्यात येत आहे. पण ही लीग पुन्हा सुरु करताना पाकिस्तानच्या संघावर मोठी नामुष्कीची वेळ आली असल्याचे आता समोर आले आहे.भारताने पाकिस्तानला एकामागून एक मोठे धक्के दिले. त्यामळे पाकिस्तान हादरले आहे. पाकिस्तानमधील रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियमलाही हादरा बसला आहे आणि त्यानंतरच ही लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने ही लीग स्थगित तर केली, पण आता पुन्हा सुरु करताना मात्र त्यांच्या नाकीनऊ आले आहेत. भारतामध्ये आयपीएलची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आयपीएलचे सर्व संघ मैदानात उतरले आहेत आणि त्यांचा सराव सुरु झाला आहे. पण पाकिस्तानमध्ये मात्र अजूनही जुळवाजुळव सुरुच आहे. आायपीएलमधील बरेच खेळाडू मायदेशी परतले होते, तर काही खेळाडू भारतामध्येच आहेत. बऱ्याच परदेशी खेळाडूंनी आता भारताची वाट धरलेली आहे आणि काही तासांतच ते आता भारतात दाखल होतील. पण दुसरीकडे मात्र कोणतेही परदेशी खेळाडू पाकिस्तानात दाखल होण्यासाठी तयार नसल्याचे आता समोर येत आहे. 'मायदेशी परतलेले परदेशी खेळाडू लीगसाठी पुन्हा पाकिस्तानात येतील का? हाच आता मोठा प्रश्न आहे. ही लीग सर्वोत्तम खेळाडूंनिशी पूर्ण व्हावी, यासाठी पाकिस्तान बोर्ड आणि लीगमधील संघांचे व्यवस्थापन प्रयत्न करत आहेत, पण त्यामध्ये अद्याप यश आलेले नाही,' असे पाकिस्तान बोर्डाशी संबंधित सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आता परदेशी खेळाडूंनी पाकिस्तान सुपर लीगकडे पाठ फिरवली आहे, असे दिसत आहे. त्यामुळे एकिकडे भारतात परदेशी खेळाडू परतत असताना पाकिस्तानमध्ये मात्र खेळाडू येण्यास नकार देत असल्यामुळे आता त्यांची जगासमोर लाज गेली आहे. पाकिस्तानमधील जे खेळाडू आपल्या देशात गेले आहेत, त्यांना वाईट अनुभव आला आहे. पाकिस्तानमधून निघताना ते जीव मूठीत घेऊन निघाले. कधीही त्यांचा जीव जाऊ शकला असता. इंग्लंडचा टॉम करन तर रडालाच लागला होता. त्यामुळे आता परदेशी खेळाडू हे पाकिस्तानमध्ये परतणार असल्याचे दिसत नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील क्रिकेट लीग आता पूर्वपदावर येऊ शकत नाही, असेच चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WFEpOuA

No comments:

Post a Comment