बंगळुरु : गेले काही दिवस आरसीबीसाठी एकामागून एक वाईट बातम्या येत होत्या, पण आता आरसीबीच्या संघावर दाटलेले वाईट ढग आता दूर झाले आहेत. कारण आरसीबीच्या संघासाठी आता एक गुड न्यूज आली आहे. त्यामुळे विराट कोहलीची चिंता आता मिटली आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यपूर्वी आता असं घडलं तरी काय आहे, हे आता समोर आले आहे.आरसीबीच्या संघाला एकामागून एक तीन बॅड न्यूज मिळाल्या होत्या. त्यामध्ये पहिली वाईट बातमी अशी होती की, आरसीबीचा मॅचविनर गोलंदाज जोश हेझलवूडला दुखापत झाली आहे आणि तो पुढची आयपीएल खेळू शकणार नाही. त्यानंतर आरसीबीच्या चाहच्यांना दुसरी वाईट बातमी मिळाली होती की, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारला चेन्नईच्या सामन्यात दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो १० दिवस मैदानात उतरू शकणार नाही. त्यानंतर तिसरी वाईट बातमी अशी आली होती की, आरसीबीच्या सामन्यात पावसाची जोरदार शक्यता आहे. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांना एकामागून एक तीन धक्के बसले होते. विराट कोहली हा संघातील वरिष्ठ खेळाडू आहे, पण त्याला एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे त्याची चिंता वाढलेली हती. पण आता आरसीबीच्या संघाला एक चांगली बातमी मिळाली आहे. कारण आता आरसीबीला जेतेपदाची आशा दिसू लागली आहे, त्यामुळे विराटची चिंता मिटल्याचे चाहते म्हणत आहेत.आरसीबीने या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली. रजतने नेतृत्व करताना आरसीबीच्या संघात संजीवनी आणली. त्यामुळेच आरसीबीचा संघ आता प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो, असे दिसत आहे. रजतला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. पण आता रजत या दुखापतीमधून सावरला आहे आणि तो सारव करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे रजत पाटीदार आता फिट झाला असून आरसीबीच्या संघासाठी ही सर्वाच मोठी आनंदाची बातमी असणार आहे. त्याचबरोबर विराट कोहलीची चिंता यामुळे मिटणार असल्याचे समोर येत आहे.आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकता आलेली नाही. पण यावेळी त्यांना जेतेपद पटकावण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे विराट कोहली एकदा तरी आयपीएलची ट्रॉफी जिंकणार की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YzaDo09
No comments:
Post a Comment