Breaking

Friday, May 23, 2025

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून, सुधारित वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना https://ift.tt/TaMKgCx

: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आता माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने ही प्रक्रिया येत्या सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या सोमवारी, २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करू शकतील. ऑनलाइन नोंदणी आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठी ३ जूनपर्यंतची मुदत असून पहिली यादी १० जूनला जाहीर होईल.यंदा शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा वेळेआधीच घेत निकालही १३ मे रोजी जाहीर केले होते. त्यानंतर १९ मेपासून विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणाही झाली होती. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी १६ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ही नोंदणी १७ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर १९ आणि २० मे रोजी सराव सत्रे पार पडल्यावर २१ मेपासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र आयत्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने या प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. : सुधारित वेळापत्रक गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत जाहीर होणे अपेक्षित असताना त्यातही काहीशी दिरंगाई झाली. अखेर संचालक डॉ. महेश पालकर यांनी सोमवार, २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा सुरू होत असल्याचे जाहीर केले.ही प्रक्रिया या अधिकृत संकेतस्थळावरून राबवली जाणार आहे, असे डॉ. पालकर यांनी स्पष्ट केले. पहिल्या यादीत प्राधान्यक्रम दिलेल्या महाविद्यालयांपैकी एखाद्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करायचा असेल, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पोर्टलवर 'प्रोसीड फॉर ॲडमिशन' हे बटण क्लिक करून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.11th Online Admission Important Instructions for Students: हे लक्षात ठेवा!ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, ते पुढील फेरीसाठी थांबू शकतात. पण पहिला पसंतीक्रम दिलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे नाव आले असेल, तर त्याला त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचाच आहे. समजा विद्यार्थ्याने या महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही, तर तो चौथ्या फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर असेल. त्याला शेवटी सर्वांसाठी खुल्या फेरीतूनच प्रवेश घेता येईल. Maharashtra FYJC Admission 2025- Important dates: अकरावीसाठी २६ मे ते ३ जून नोंदणीसाठी मुदत (सुधारित वेळापत्रक) -
  • २६ मे: ऑनलाइन विद्यार्थी नोंदणी व महाविद्यालय पसंतीक्रम (सकाळी ११ ते ३ जून सायं. ६)
  • ५ जून : तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
  • ६ ते ७ जून : हरकती, सुधारणा व आक्षेप दाखल करणे
  • ८ जून : गुणवत्ता यादी निश्चित करणे
  • ९ जून : अल्पसंख्याक, इन-हाउस, व्यवस्थापन कोटा जाहीर
  • १० जून : पहिली यादी जाहीर व प्राधान्यक्रम जाहीर
  • ११ ते १८ जून : विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zeWuLMI

No comments:

Post a Comment