मुंबई : शुभमन गिलच्या गळ्यात अखेर भारताच्या कर्णधारपदाची मिळ पडली आहे. आताा भारताचे भविष्य गिलच्या हातात असेल. पण शुभमन गिलला भारताचे कर्णधार करण्यामागचे कारण काय, अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आता शुभमन गिलचा भारतामधल्या स्पर्धांमधला कॅप्टन्सीचा रेकॉर्ड आहे तरी कसा, हे आता समोर आले आहे.
आयपीएलच्या नेतृत्वाला का महत्वं नाही...
भारताच्या कसोटी संघाचे जर कोणाला कर्णधारपद द्यायचे असेल तर त्यासाठी आयपीएलमधील नेतृत्व पाहून काहीच फायदा नाही. कारण आयपीएल ही फक्त २० षटकांची असते तर कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवसाला ९० षटकांचा खेळ होत असतो. त्यामुळे आयपीएलमधील नेतृत्व हे कसोटी क्रिकेटचा कर्णधार करण्यासाठी पाहिले जाऊ शकत नाही.कसोटी कर्णधारासाठी कुठली कामगिरी महत्वाची...
क्रिकेटचं मूळ हे कसोटी क्रिकेट समजले जाते. त्यामुळे टी २० किंवा वनडे क्रिकेटमधील कामगिरी तेवढी लक्षात घेतली जात नाही. पण त्यासाठी स्थानिक क्रिकेटमधील त्याची कामगिरी कशी आहे, हे पाहता येऊ शकते. भारतामध्ये रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा खेळवली जाते, प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने होतात, ज्यामध्ये कसोटी क्रिकेटसारखाच कस लागतो. या स्थानिक क्रिकेटमध्ये शुभमन गिलला नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये त्याची कामगिरी कशी झाली आहे, हे आता समोर आले आहे.शुभमन गिलची कामगिरी कशी झाली आहे..
आतापर्यंत पंजाबकडून खेळताना गिलने पाच सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. या पाच सामन्यांमध्ये फक्त एकच सामना गिलला जिंकता आला आहे, तर त्याला चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. या गोष्टीचा अर्थ की, गिलची यशाची टक्केवारी ही २० टक्के आहे. एका सामन्याततर गिल नेतृत्व करत असताना संघाला तब्बल २०७ धावांनीही पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे गिलला नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव नसल्याचे आता समोर आले आहे.शुभमन गिलची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. ही निवड फक्त तो युवा आहे आणि काही काळ भारतीय संघात आहे, या दोन गोष्टींच्या जोरावरच करण्यात आली असावी, असे आता समोर येत आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ES3GAy0
No comments:
Post a Comment