नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण मुंबई इंडियन्सचा संघ आता टॉपवर पोहोचू शकते. मुंबईचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर कसा पोहोचू शकतो, याचे समीकरण आता समोर आले आहे. हे समीकरण आता सोप्या शब्दांच समजून घेता येऊ शकते.
मुंबई इंडियन्सची स्थिती आहे तरी कशी..
मुंबईच्या संघाचे सध्याच्या घडीला १३ सामने झाले आहेत. या १३ सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने आठ विजय साकारले आहेत. मुंबईला पाच सामन्यांत पराभव पत्करावे लागलेले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचे १३ सामन्यांनंतर १६ गुण झालेले आहेत. मुंबईचा संघ या १६ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. पण मुंबईचा संघ जरी चौथ्या स्थानावर असला तरी ते थेट अव्वल स्थानावर कसे पोहोचू शकतात, याचे समीकरण आता समोर आले आहे.पॉइंट्स टेबलची परिस्थिती काय सांगते...
सध्याच्या घडीला पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ हा अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्सच्या खात्यात १८ गुण आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पंजाबचा संघ आहे, पंजाबच्या खात्यात १७ गुण आहेत. आरसीबीचेही १७ गुण आहेत. पण पंजाबचा रनरेट हा आरीसबीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पंजाबचा संघ दुसऱ्या आणि आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.मुंबईचा संघ अव्वल स्थानावर कसा जाऊ शकतो, पाहा समीकरण...
गुजरातचे सर्व साखळी सामने झाले आहेत, त्यामुळे त्यांचे गुण वाढू शकत नाही. दुसरीकडे मुंबईचा पुढचा सामना हा आता पंजाबबरोबर होणार आहे. मुंबई आणि पंजाब हा दोन्ही संघांचा अखेरचा साखळी सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना जर मुंबई इंडियन्सचा संघ जिंकला तर त्यांचे १८ गुण होतील. या परिस्थितीत मुंबई आणि गुजरात या दोन्ही संघांचे समान १८ गुण असतील. पण मुंबईचा रनरेट हा गुजरातपेक्षा भरपूरच चांगला आहे, त्यामुळे दोन्ही संघांचे समान गुण झाले तर मुंबईचा संघ अव्वल स्थानावर विराजमान होईल आणि गुजरातच्या संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण होऊ शकते. दुसरीकडे पंजाबचा संघ जर पराभूत झाला तर ते १७ गुणांसह तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर राहू शकतात आणि मुंबईचा संघ हा अव्वल स्थानावर पोहोचू शकतो.मुंबईच्या संघाला अव्वल स्थानावर जाण्याची सुवर्णसंधी असणार आहे. पण त्यासाठी मुंबईच्या संघाला काय करावे लागेल, हे आता समोर आले आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oHcj3VE
No comments:
Post a Comment