Breaking

Saturday, May 24, 2025

'घटनेला जबाबदार असणाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्यास...' Vaishnavi Hagawane प्रकरणी शिंदेंचा थेट इशारा https://ift.tt/hGfUvjE

अभिजीत दराडे, पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवी हगवणेच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबीयांना भेट दिली आहे. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करुन धीर दिला आहे. तर दोषींविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे आश्वस्त केले आहे. शिंदेंनी म्हटले, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कोणी कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न किंवा मदत करण्याचा देखील करू नये, असेही त्यांनी ठणकावले.माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'वैष्णवीला मारहाण झाल्याचे फोटो मी पाहिले. तिच्या आई-वडिलांची नातेवाईकांची मानसिकता पूर्ण खालावलेली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. अशा राज्यात ही घटना घडणं हे दुर्दैवी तर आहेच. पण विश्वास देखील करू शकत नाही, अशी अमानवीय घटना आहे. मला सगळ्या बाबी कस्पटेंनी सांगितल्या त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या. कुटुंबीयांना वाटतं की, आमची मुलगी नऊ महिन्याचं बाळ समोर असताना अशी आत्महत्या करू शकत नाही. पोलीस तपास करत आहेत गुन्हा दाखल झाला आहे एसआयटी देखील नेमली आहे. या घटनेत दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, यामध्ये कोणी कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न किंवा मदत करण्याचा देखील करू नये, अशा शब्दांत शिंदेंनी ठणकावले आहे. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, कस्पटेंच्या मुलीला मारहाण होत होती. पैशांची मागणी केली जात होती. सून म्हणजे आपल्या मुलीप्रमाणे असते. प्रत्येकाला वाटतं आपली मुलगी ज्या घरात जाईल, तिकडे त्याला मुलीप्रमाणे वागवलं पाहिजे असं माहेरच्यांना वाटतं. जसं आपण लाडकी बहीण लाडकी मुलगी, असं म्हणतो तशी लाडकी सून ही मानसिकता झाली पाहिजे, अशी परिस्थिती या घटनेने समोर आणली आहे. कस्पटे कुटुंबाची मुलगी म्हणजे आमच्या घरातली मुलगी म्हणूनच या प्रकरणाकडे आम्ही पाहत आहोत. यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही.'या प्रकरणात मुख्यमंत्री स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत, कस्पटे परिवाराला जे जे वाटतंय, त्या बाजूने तपास केला जाईल. उच्चस्तरीय चौकशी या प्रकरणात होत आहे. यामध्ये कुठेही त्रुटी राहणार नाही, याची काळजी सरकार घेईल,' असेही एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केले आहे. महिला आयोगाच्या कारवाईबाबत प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, 'या घटनेमध्ये कोणीही राजकारण आणता कामा नये. या घटनेला राजकीय दृष्टिकोनातून पाहूच नये. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे त्यासोबतच अशा पद्धतीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अशा कारवाईची देखील गरज आहे. त्यामुळे शासनाचा फोकस असेल की दोषींवर कठोर कारवाई करणे बाकी राजकारण करायला अनेक संधी असतात.'


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4ql6cfL

No comments:

Post a Comment