Breaking

Monday, May 19, 2025

SRH vs LSG : घरच्याच मैदानावर लखनौवर ओढवली नामुष्की, प्लेऑफचं स्वप्न भंगल, हैदराबादचा दमदार विजय https://ift.tt/5qIoyYj

लखनौ: सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना रंगला. एकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौला 205 धावा केल्या. याउलट हैदराबादने 206 धावा केल्या आणि सामना 6 विकेट्सने जिंकला. यासह, लखनौ संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करत 205 धावा केल्या, प्रत्युत्तरात हैदराबादने 19 व्या षटकात 6 विकेट्स शिल्लक असताना लक्ष्य गाठले. एसआरएचकडून अभिषेक शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 206 धावांचे लक्ष्य मिळाले. एसआरएचची सुरुवात चांगली झाली नाही कारण सलामीवीर अथर्व तायडे फक्त 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्यात 82 धावांची मोठी भागीदारी झाली. दरम्यान, 35 धावांवर इशानला क्लीन बोल्ड केले. संघाची सुरुवात इतकी स्फोटक होती की त्यांनी पहिल्या 7 षटकांत 98 धावा केल्या. चौकार आणि षटकारांच्या पावसात, अभिषेक शर्माने फक्त 20 चेंडूत 59 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 6 षटकार मारले. लवकरच, एसआरएचने 10 षटकांत 2 गडी गमावून 120 धावा केल्या. शेवटच्या 60 चेंडूत त्याला 86 धावांची आवश्यकता होती.

अभिषेक शर्माने केला मोठा विक्रम

अभिषेक शर्माने त्याच्या कारकिर्दीत चौथ्यांदा 20 चेंडूंपेक्षा कमी वेळात अर्धशतक पूर्ण केले आहे. या बाबतीत, त्याने निकोलस पूरनची बरोबरी केली आहे, ज्याने आयपीएलमध्ये चार वेळा 20 पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक केले आहे. आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक 16 चेंडूत होता, जो त्याने 2024 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध केला होता. लखनौसाठी मिचेल मार्श आणि निकोलस पूरनने अनुक्रमे 65 आणि 45 धावांची स्फोटक खेळी केली, परंतु अभिषेक शर्मासमोर हे सर्व फिके पडले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/kuJGLgi

No comments:

Post a Comment