चंदीगड: एका फ्लॅटमध्ये 24 वर्षीय तरुणीची बॉडी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. गुरुग्रामच्या डीएलएफ फेस-3 मध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याची माहिती आहे. ही तरुणी एका मल्टीनॅशनल (MNC) कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे. ती मुळची नफजगड येथील राहणारी होती. जागृती खन्ना (वय 24) अशी तिची ओळख झाली आहे.या घटनेचा उलगडा त्यावेळी झाला जेव्हा शेजारच्या लोकांना या फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. शेजारच्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून फ्लॅटचं दार तोडलं, तेव्हा त्यांचा जागृतीचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
तीन-चार दिवसांपासून मृतदेह फ्लॅटमध्ये पडून
या प्रकरणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदहे जवळपास तीन ते चार दिवस जुना असल्याचं दिसत आहे. प्रथमदर्शनी हे प्रकरण आयुष्य संपवल्याचं असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या तरुणीने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत सध्या काहीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबांला या घटनेची माहिती दिली असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तपासानंतरच जागृतीने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी फ्लॅटमधून जागृती खन्नाचा मोबाईल जप्त केला आहे. ते सध्या तिच्या मोबाईल फोनचा तपास करत आहे. तसेच, सोशल मीडिया स्टेटस आणि चॅट्सही तपासले जात आहेत. जेणेकरुन तिच्या मृत्यूबाबत काही क्लू मिळेल. आश्चर्याची बाब म्हणजे इतके दिवस जागृती ऑफीसला गेली नाही, तरी तिच्या कंपनीने कुठल्याही प्रकारे तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच, ती गैरहजर असल्याची तक्रारही कोणी केली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचं कारण कळेल आणि या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेने मात्र एकच खळबळ माजली आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tzEneCy
No comments:
Post a Comment